- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेरमधील ‘त्या’ घुसखोरांची एटीएस मार्फत चौकशी करा ; आमदार संग्राम जगताप काय म्हणाले पहा

पारनेरमध्ये सकल हिंदू समाजाचा रास्ता रोको
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील वडझिरे व परिसरातील गावांमध्ये काही बांगलादेशी घुसखोर व रोहिंग्यांनी अनधिकृतपणे वास्तव्य करून स्थानिक नागरिकांना त्रास देणे आणि जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू केले असल्याचा आरोप करत आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देवी भोयरे फाटा येथे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांनी प्रशासनाला सज्जड इशारा दिला.

आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्टपणे मागणी केली की, या भागातील कथित घुसखोरांची केवळ स्थानिक पातळीवर चौकशी न करता ती दहशतवाद विरोधी पथकामार्फत करण्यात यावी. स्थानिक नागरिकांच्या जमिनी बळकावण्याच्या वाढत्या घटनांमुळे जनतेमध्ये असंतोष असून, प्रशासनाने यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा स्थानिक नागरिक स्वतःच या घुसखोरांचा बंदोबस्त करतील, असा इशारा त्यांनी दिला. वडझिरे परिसरासह संपूर्ण पारनेर तालुक्यातून अशा अवैध घुसखोरांचा बीमोड करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर भविष्यात यापेक्षाही मोठे आंदोलन उभारले जाईल आणि प्रशासनाच्या परवानगीची वाट न पाहता कायदा हातात घेऊन नागरिक या घुसखोरांचा बंदोबस्त करतील, अशा शब्दांत त्यांनी आपला पवित्रा मांडला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडझिरे आणि परिसरात वाढत्या अवैध घुसखोरीच्या मुद्द्यावरून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घुसखोरीच्या विरोधात आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी सोमवारी 1 जून 2026 रोजी आमदार संग्राम जगताप व सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीने पारनेर-बेल्ह-आळेफाटा रोडवरील देवीभोयरे फाटा येथे भव्य मरास्ता रोकोफ आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या, तसेच बांगलादेशी जिहादी वृत्तीच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनादरम्यान अवैध घुसखोरीच्या विरोधात सकल हिंदू समाज मैदानातफ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

हे सुद्धा वाचा :  मतदारयादी विशेष पुनरावलोकन मोहिमेच्या माध्यमातून विरोधी मतदारांची नावे गायब करण्याचे षड्यंत्र ः काळे

या आंदोलनात सकल हिंदू समाजाचे शेकडो बांधव, महिला, युवक आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंदुत्ववादी आमदार संग्राम जगताप आणि धर्मरक्षक सागर बेग यांची विशेष उपस्थिती होती. आपल्या भाषणातून त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला की, जर तातडीने या घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली गेली नाही, तर हे जनआंदोलन अधिक तीव्र केले जाईल. या आंदोलनामुळे पारनेर-बेल्ह-आळेफाटा मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

कायदा हातात घेण्यास भाग पाडू नका…
जर प्रशासनाने या घुसखोरांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली, तर भविष्यात यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. इतकेच नव्हे, तर प्रशासनाच्या परवानगीची वाट न पाहता कायदा हातात घेऊन नागरिक स्वतः या घुसखोरांचा बंदोबस्त करतील, असा इशारा त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी दिला.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ