- जाहिरात -spot_img
breaking news

श्रीगोंद्यात महाविद्यालयीन तरुणीसमोर तरुणाची आत्महत्या; शहरात खळबळ

 

श्रीगोंदा / नगर सह्याद्री –
शहरातील शिवाजीनगर परिसरात काल दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीसमोरच एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीकडे संबंधित तरुण काल दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आला होता. दोघांमध्ये काही वेळ संभाषण झाल्यानंतर अचानक या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले. ही घटना तरुणीच्या समोरच घडल्यामुळे ती घाबरून गेली असून परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तरुणाला तात्काळ उपचारासाठी श्रीगोंद्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसून प्रेमसंबंध की इतर कोणते कारण याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मात्र अधिकृत माहिती तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकवर्गानेही चिंता व्यक्त केली आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा :  पारनेर ते लोणी रस्त्यालगत दारूच्या बाटल्यांचा खच; उच्चभ्रू वस्तीत ‘संस्कारां’चा कचरा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ