अहिल्यानगर | नगर सह्याद्री
तपोवन रस्ता आणि सावेडी गाव परिसरात एका ठेकेदाराला लाकडी अथवा फायबरच्या पाईपने बेदम मारहाण करून, जबरदस्तीने गाडीत बसवून लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शिवाजी भानुदास वाघमोडे (वय 41, रा. सिद्धिविनायक नगर, तपोवन रोड) हे 1 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कामगारांना सोडून आपल्या चारचाकी गाडीने घरी चालले होते. स्वराज ट्रेडर्सजवळ आले असता, पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांनी गाडीला कट मारल्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांनी वाघमोडे यांना गाडीतून खाली खेचून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
बनावट पत्र; आरटीओ कार्यालयाची फसवणूक
अहिल्यानगर: केंद्र सरकारच्या रिजनल ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर योजनेचा लाभ घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे बनावट पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार अहिल्यानगर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात साई कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि त्यांचे प्रतिनिधी राहुल म्हस्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई कन्स्ट्रक्शन कंपनीने मदडगाव (ता. अहिल्यानगर) येथे ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानुसार मोटर वाहन निरीक्षक मंगेश वाघ यांनी जागेची पाहणी केली असता, तेथे जाण्यासाठी कच्चा रस्ता असल्याने पोहोचता येत नसल्याचा अहवाल त्यांनी दिला. यानंतर कंपनीचे प्रतिनिधी राहुल म्हस्के यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक पत्र आरटीओ कार्यालयाला आणून दिले, ज्यामध्ये दोन-तीन महिन्यांत पक्का रस्ता पूर्ण होणार असल्याचा उल्लेख होता. तथापि, आरटीओ अधिकाऱ्यांनी या पत्राची खात्री करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी असे कोणतेही पत्र दिले नसल्याचे स्पष्ट केले. पत्रावरील स्वाक्षरी खोटी असून कार्यालयाची फसवणूक करण्यासाठी हे बनावट पत्र तयार केल्याचे समोर आले.
हॉटेल चालकाकडून ग्राहकाला मारहाण
अहिल्यानगर: हॉटेलमध्ये जेवण आटोपल्यानंतर टेबलवरील कोल्डड्रिंकच्या बाटलीबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून हॉटेल मालक आणि वेटरांनी मिळून दोन ग्राहकांना लोखंडी रॉडने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना टिळकरोडवरील हॉटेल नंदनवन येथे घडली आहे. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या कमरेला फॅक्चर झाले आहे. तसेच मारहाण करणाऱ्यांनी ग्राहकांचे तीन मोबाईल आणि सोन्याची चैन हिसकावून नेल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजीपाला व्यावसायिक अक्षय संजय शेलार (वय 29, रा. श्रीरामचौक, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून हॉटेलच्या काउंटरवरील आदेश जाधव आणि हिरा जाधव (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यासह हॉटेलमधील इतर 10 ते 12 वेटरांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तरुणावर हल्ला
अहिल्यानगर: शहरातील सावेडी भागातील सिव्हिल हाडको परिसरामध्ये एका 41 वषय नोकरदार तरुणावर लोखंडी वस्तूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे. पूव दिलेली पोलिस तक्रार मागे घेतली नाही, या कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सुहास बाबासाहेब जगताप (वय 41, रा. सिव्हिल हाडको, सावेडी, अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. जगताप यांनी महिनाभरापूव त्यांचे शेजारी राहणारे लाभेश जवाहरलाल चंगेडीया यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती. याच कारणाचा राग मनात धरून लाभेश चंगेडीया हा जगताप यांना सतत रस्त्यात अडवून केस मागे घेण्यासाठी धमकावत होता.










