- जाहिरात -spot_img
breaking news

राजमाता जिजाऊ सभागृहाचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करा; महापौर गाडे यांच्या प्रशासनाला सूचना

शहर विकासाच्या निर्णयांसाठी सुसज्ज सभागृहाची गरज : उपमहापौर जाधव

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीतील राजमाता जिजाऊ सभागृहाची महापौर ज्योतीताई गाडे यांनी पाहणी करून सभागृहाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

महासभेदरम्यान शहराच्या विकासासंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे निर्णय या सभागृहात घेतले जातात. मात्र सभागृहाचे काम दीर्घकाळापासून प्रलंबित असल्यामुळे पदाधिकारी व अधिकार्‍यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राजमाता जिजाऊ यांच्या नावाला साजेसे आणि सुसज्ज असे सभागृह उभारण्यासाठी प्रशासनाने तातडीने काम सुरू करावे, अशा सूचना महापौर ज्योतीताई गाडे यांनी दिल्या.यावेळी उपमहापौर अ‍ॅड. धनंजय जाधव, माजी उपमहापौर गणेश भोसले, गटनेते प्रकाश भागानगरे, नगरसेवक सुरेश बनसोडे, दत्ता गाडळकर, गोरख पडोळे, जितू गंभीर तसेच शहर अभियंता मनोज पारखे आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

उपमहापौर जाधव म्हणाले की, सध्या सभागृहाची अवस्था अत्यंत बिकट असून त्याचे काम तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. चांगल्या आणि सुसज्ज सभागृहातून सकारात्मक चर्चा घडून येते आणि त्यातून शहर विकासाची कामे गती घेतात. त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेचे राजमाता जिजाऊ सभागृह सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, सभागृहामध्ये अनेक ठिकाणी लाईटच्या वायर खाली लोंबकळलेल्या दिसतात. काही ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही तर कधी कधी माईकचाही आवाज येत नाही. महासभा सुरू असताना या कारणांमुळे अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे महापालिकेचे सभागृह सुसज्ज आणि व्यवस्थित असावे, यासाठी प्रशासनाने तातडीने पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

 

हे सुद्धा वाचा :  प्रलंबित मोजणी प्रकरणे तातडीने मार्गी लावा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ