अकोला देशात सर्वाधिक उष्ण, पारा थेट ४७ अंशावर
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
वन विभागाच्या जिल्हा कार्यालयात घडलेल्या धाडसी चंदन चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. ही घटना १८ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथील वन विभागीय कार्यालयात रात्रपाळीवर असलेले वन मजूर रमेश पोपट शेळके (वय ५८, रा. गुंडेगाव) यांना चार अनोळखी आरोपींनी अशोकाच्या झाडाला बांधून सहाय्यक वन संरक्षक यांच्या निवासस्थानाजवळील सुमारे २० हजार रुपये किमतीची दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेली. या प्रकरणी अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली मागील पाच वर्षातील एप्रिल महिन्यातील अकोल्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. ४६.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. यापूर्वी एप्रिल महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ४७.७ इतकं अकोला येथेचं २०१९ मध्ये नोंदले गेले होते. आता पुन्हा यंदा अकोल्याच्या तापमानाचा पारा एप्रिल महिन्यात ४७ अंशाच्या जवळपास पोहोचला.
विदर्भातील तापमान
अकोला – ४६.९, अमरावती – ४६.८, बुलढाणा – ४३.५, भंडारा – ४४.०, ब्रह्मपुरी – ४४.२, चंद्रपूर – ४५.०, गडचिरोली – ४४.६, गोंदिया – ४४.४, नागपूर – ४५.४, वर्धा – ४६.४, वाशिम – ४४.६, यवतमाळ – ४६.०
अहिल्यानगरकर होपरळले… ; जिल्ह्यात ४१.२ अंश सेल्सिअसची नोंद
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल ४१ ते ४५ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात ४१. २ अंश सेल्सिअस तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे दुपारपूर्वीच रस्ते सामसूम झाल्याचे दिसून येत आहे. याचा मोठा परिणाम दैनंदीन कामकाजावर होताना दिसत असून, रस्ते आणि बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे. विहिरींच्या पाण्याची पातळीही झपाट्याने कमी होत आहे. दरम्यान, परभणीत उष्माघातामुळे पहिला बळी गेला आहे. नाशिक येथून परभणीत भावाकडे आलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. परभणीच्या नांदखेड रोड भागात ही घटना घडली आहे. शिवाजी बबन कांबळे वय ३७ असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर शिवाजी कांबळे यांच्या भावाच्या फिर्यादीवरू नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्याच्या विविध भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढताना दिसून येत आहे. राज्यातील जवळपास २२ जिल्ह्यांत तापमानाने चाळिशीचा पारा ओलांडला आहे. इतकेच नाही तर काही भागांत तापमानाने ४५ अंशांचा टप्पाही ओलांडला आहे. त्यातच आता हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.










