राळेगण थेरपाळ | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्याचे सुपुत्र व शिरूर येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. स्वप्नील भालेकर यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी दिल्ली येथील जंतर मंतर वरील आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होत पारनेर चा आवाज राष्ट्रीय पातळीवर पोहचवला.
हातात तिरंगा व संविधान घेत प्रत्यक्ष सक्रिय सहभाग नोंदविला. आंदोलनादरम्यान त्यांनी दिलेल्या घोषणा चे व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत असून शिरूर, पारनेर सह राज्यातून त्यांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे. डॉ. भालेकर हे व्यवसायाने जरी डॉ. असले तरी सामाजिक प्रश्नावर त्यांनी कायमच आवाज उठवत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनी सुरुवातीपासून पाठिंबा दिला असून सोशल मीडिया च्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम ते करत असतात.
विद्यार्थ्यांचे प्रश्न हे केवळ विद्यार्थ्यांचे नसून देशाच्या भवितव्याशी निगडीत आहेत. त्यांची भूमिका ही चुकीची नसून सरकारने या आंदोलन दडपण्यापेक्षा आंदोलन सामंजस्याने सोडवणे गरजेचे होते. विद्यार्थ्यांच्या भूमिका किमान ऐकणे गरजेचे होते. गेल्या तेवीस दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणाला सत्ताधारी पक्षातही एकही सदस्याने साधी भेट ही दिली नाही. तर मार्ग काढणार कसा. ज्या पालकांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत ज्यांनी अहोरात्र अभ्यास केला किंवा करत आहेत त्यांना या आंदोलनाचे महत्त्व आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी ही त्यांनी अण्णा हजारे यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा करून लेखी मागणी ही दिली होती. त्यांच्या या भेटीनंतर अण्णा हजारे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारने आंदोलकांशी संपर्क साधावा अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे या आंदोलनाला व विद्यार्थ्यांना बळ मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त झाली.










