- जाहिरात -spot_img
breaking news

राहुरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; वृद्धाचा मृत्यू तर 15 जण जखमी

कोल्हार / राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी तालुक्यातील चिंचोली शिवारात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. आज सकाळी साधारण नऊ वाजेच्या सुमारास एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केला. त्यात या व्यक्तीचा मृत्यू झाला असून तब्ब्ल 15 जणांना चावा घेतल्याने काही किरकोळ तर काही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा ते कोल्हार शिवारात असलेल्या वस्तीवर सध्या पिसाळलेल्या कुत्र्याची एकाप्रकारे दहशत पसरली असल्याचे चित्र आहे, आज सकाळी घराच्यासमोर आराम करत असलेल्या साहेबराव राघुजी वाघमारे (वय 70) यांच्यावर अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. काही कळायच्या आत या कुत्र्याने त्यांना गंभीर जखमी केले. संपूर्ण शरीरावर घेतलेल्या चाव्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.

जवळपासच्या ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला. गंभीर जखमी झालेले वाघमारे हे मृत पावले होते.   यानंतर या कुत्र्याने आपला मोर्चा लोकवस्तीत वळवला आणि जवळपास 15 ग्रामस्थांना चावा घेत जखमी केले, या हल्ल्यात काही जण किरकोळ तर काही जण गंभीर जखमी झाले असून हा कुत्रा मात्र मोकाट सुटलेला आहे, वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुनील साळुंखे, वनपाल संदीप कोरके, वनपाल बाळासाहेब आटोळे, वाहन चालक ताराचंद गायकवाड व आपत्ती व्यवस्थापनचे आपदा मित्र अनिल जाधव व रेस्क्यू टीम यांनी शोध मोहीम राबविली. मात्र, कुत्रा सापडलेला नसल्याने या कुत्र्यापासून ग्रामस्थांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .

हे सुद्धा वाचा :  ‘संदीप उद्योग समूह’ची जागतिक स्तरावर वेगळी ओळख ; सिने अभिनेता सोनू सूद
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ