एक जुलैपासून नवीन दर जाहीर
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुका सलून व्यावसायिकांची बैठक नुकतीच पारनेर येथे नाभिक तालुकाध्यक्ष भाऊ भिडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात वाढत्या महागाईवर सविस्तर चर्चा झाली. सध्या सर्वच स्तरातील व्यवसाय़ामध्ये दरवाढ झाली असून, दुकान भाडे, वीजबिल तसेच नाभिक व्यवसाय साहित्य यांच्या किमती गगनाला भिडल्यान सर्वानुमते दरवाढ करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे अध्यक्ष बिडे यांनी सांगितले. सलून दरात 20% ने वाढ केली जाणार आहे. ही दरवाढ जुलै महिन्यांपासून करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात झाला.
यावेळी पारनेर तालुका नाभिक संघटना सचिव सुनील आतकर, जिल्हा उपाध्यक्ष शामकांत जाधव, तालुका उपाध्यक्ष शाम साळुंके, पारनेर शहर सलून अध्यक्ष करण कार्ले, उपाध्यक्ष समीर कार्ले, सचिव नवनाथ काळे, संजय कार्ले, विजु कार्ले, प्रमोद सोनवणे, संजय वाघचौरे, संजय जाधव, राहुल काळे, नवनाथ कुटे आदींसह तालुक्यातील नाभिक बांधव व सलून व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात महागाईवर चर्चा झाली.सध्या सर्वच प्रत्येक क्षेत्रात महागाईचा भडका उडाला. या वाढत्या महागाईने त्रस्त झालेला सलून व्यवसायपण दरवाढीच्या झळातून सुटलेला नाही. सलूनचे साहित्य, कॉस्मेटिक, सौंदर्य प्रसाधने यांचे भाव वाढल्यामुळे सलून व्यवसायात दरवाढ करण्यात आली आहे. हा खर्च नाभिक व्यावसायिकांना न परवडणारा असल्याने ही भाववाढ करणे गरजचे असल्याचे मत तालुकाध्यक्ष शाम साळुंके यांनी व्यक्त केले.












