- जाहिरात -spot_img
breaking news

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणूकांची रणधुमाळी!; १६ जागांसाठी निवडणूक, अहिल्यानगरचाही समावेश…

मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या प्रदीर्घ काळापासून रिक्त असलेल्या १६ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या सर्व १६ जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील असून या जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत २५ मे ते १ जून असणार आहे, तर अर्जांची छानणी २ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने या मतदारांतून होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकाही लांबल्या होत्या. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्याने विधानपरिषदेच्या या १६ जागांसाठीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्व अटी व निकष पूर्ण झाल्याने निवडणूक जाहीर
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी संबंधित मतदारसंघातील किमान ७५% स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि किमान ७५% मतदार (लोकप्रतिनिधी) पदावर असणे अनिवार्य आहे.

महाराष्ट्रात या निकषांची पूर्तता न झाल्यामुळे या १६ जागांवर निवडणूक घेता आली नव्हती. मात्र, आता या सर्व अटी व निकष पूर्ण झाले असल्याचा अहवाल महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

कोणत्या मतदारसंघांसाठी होणार निवडणूक
पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली.

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
अधिकृत अधिसूचना जारी करणे : २५ मे २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत: ०१ जून २०२६ (सोमवार)
उमेदवारी अर्जांची छाननी : ०२ जून २०२६ (मंगळवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस: ०४ जून २०२६ (गुरुवार)
मतदानाचा दिनांक : १८ जून २०२६ (गुरुवार)
मतदानाचा वेळ: सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत
मतमोजणी आणि निकाल : २२ जून २०२६ (सोमवार)

हे सुद्धा वाचा :  पावसाचा हाहाकार! कुठे किती?, मुंबई -पुणे बस सेवा बंद, शाळा- कॉलेजला सुट्टी...

विधानपरिषदेच्या ९ जागांवरील निवडणूक पार
काही दिवसांपूर्वीच विधानसभा सदस्यांच्या मतदानावर होणाऱ्या विधानपरिषदेच्या ९ जागांवरील निवडणूक पार पडली. विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड झालेले 9 आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक अशा दहा सदस्यांचा शपथविधी गुरुवारी सकाळी विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडला. परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या सदस्यांना शपथ दिली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ