- जाहिरात -spot_img
breaking news

मुरूम तस्करांचा नंगानाच; दोघांना जेसीबीने चिरडले, एक ठार, एक जखमी


जेऊर परिसरातील घटना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर तालुक्यातील धनगरवाडी परिसरात अवैध मुरुम तस्करी करणाऱ्यांना प्लॉट मालकाने विरोध केल्याने, तसेच जेसीबी अडविण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित जेसीबी चालकाने दोघांच्या अंगावर जेसीबी घातल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

नगर तालुक्यातील गौण खनिज तस्करांनी हैदोस घातला आहे. तालुक्यात महसूल प्रशासनाच्या आशिर्वादाने अवैध गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. विरोध केल्यास थेट अंगावर डंपर, जेसीबी घातले जात आहेत. यापूवही अशा अनेक घटना घडल्या आहेत.

गुरुवारी रात्री धनगरवाडी परिसरात अवैध मुरुम उत्खनन सुरु होते. याची प्लॉट मालकाला माहिती मिळाल्याने प्लॉट मालकाने उत्खनन करण्यास विरोध केला. तसेच जेसीबी अडविण्याचा प्रयत्न केला. जेसीबी चालकाने जेसीबी पळविण्याचा प्रयत्न केला. जेऊर जवळील जरेवस्ती येथे दोघांनी जेसीबी अडविण्याचा प्रयत्न केला परंतु जेसीबी चालकांने दोघांच्या अंगावर जेसीबी घातल्याचा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. या अपघातात एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला असून जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकारामुळे नगर तालुक्यातील गौण खनिज उत्खनन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

हे सुद्धा वाचा :  ट्रॅक्टरच्या आवाजाने बिबट्याच्या तावडीतून वाचला कुत्रा; ठोकली धूम, नगरमधील घटना
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ