- जाहिरात -spot_img
breaking news

CSK ला मोठा धक्का! आयुष म्हात्रे दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर

स्पोर्ट डेस्क – चेन्नई सुपर किंग्स साठी आयपीएल २०२६ चा हंगाम अत्यंत निराशाजनक सुरु आहे. आतापर्यंत ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या या दिग्गज संघाला १९व्या मोसमात अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ६ सामन्यांपैकी केवळ २ सामन्यांत विजय मिळवता आल्याने संघ व्यवस्थापन चिंतेत आहे.

याशिवाय, संघाचा प्रमुख अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यालाही दुखापतीमुळे पहिल्या ६ सामन्यांना मुकावं लागलं आहे. धोनी लवकरात लवकर संघात परतण्याची अपेक्षा संघाला आहे. मात्र अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

आयुष म्हात्रे दुखापतीमुळे बाहेर
चेन्नईचा युवा आणि आशादायक फलंदाज आयुष म्हात्रे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण १९व्या आयपीएल मोसमातून बाहेर पडला आहे. ही दुखापत त्याला हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात झाली.

सामन्याच्या पाचव्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर आयुष दुसरी धाव घेत असताना त्याच्या हॅमस्ट्रिंगला त्रास झाला. तो कसाबसा धावत नॉन-स्ट्रायकर एंडला पोहोचला आणि त्यानंतर जागेवरच बसला. त्याची स्थिती पाहून फिजिओ थेट मैदानात आले आणि त्याची तपासणी केली.

थोड्या वेळाने आयुषने पुन्हा बॅटिंग सुरू केली, मात्र अवघ्या काही चेंडूंनंतर तो आऊट झाला. दुखापतीमुळे त्याला हालचाल करणंही अवघड झालं होतं. आऊट झाल्यानंतर रामाकृष्ण घोष आणि फिजिओ टीमने त्याला मैदानाबाहेर नेलं.

आयुष म्हात्रेची आयपीएल २०२६ मधील कामगिरी
आयुष म्हात्रे याने चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल २०२६ मधील ६ सामन्यांत चांगली कामगिरी केली होती. त्याने या ६ सामन्यांत एकूण २०१ धावा केल्या आहेत. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने २० चौकार आणि १२ षटकार लगावले आहेत.

या दुखापतीमुळे आयुष म्हात्रेला संपूर्ण हंगाम गमवावा लागणार असल्याने चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी विभाग आणखी कमकुवत झाला आहे. धोनीच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंकडून अपेक्षा होत्या, त्यात आयुषसारख्या आशादायक फलंदाज आयपीएलमधून बाहेर पडणं संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा :  महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील, नरेंद्र मोदी काय म्हणाले
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ