- जाहिरात -spot_img
breaking news

महापालिकेत गोंधळ; श्रीपाद छिंदमला काढले सभेतून बाहेर, काय घडलं पहा

सत्ताधारी-विरोधी सर्वच नगरसेवक आक्रमक, यापुढे सभागृहात प्रवेश नको
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द काढल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदमला सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर काढले. छिंदम याला सभागृहात बोलण्याचा व बसण्याचा अधिकार नाही. त्याला प्रवेश न देण्याचा ठराव करा, त्याला बाहेर काढा, असे म्हणत सर्व नगरसेवकांनी सभात्याग करण्याचा इशारा दिला.

अंदाजपत्रकीय चर्चा सुरू असताना श्रीपाद छिंदम यांनी बजेटवरील चर्चेत सहभाग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर, गणेश भोसले, मयूर बांगरे, प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, विकी जगताप यांनी त्याला सभागृहात बसण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. भाजपाचे नगरसेवक अमोल येवले यांनीही त्याला पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे व ठाकरे गटानेही त्याला सभागृहातून बाहेर काढावे, अशी मागणी केली. संपत बारस्कर यांनी छिंदम याला सभागृहात न थांबता बाहेर जाण्याबाबत सांगितले. त्यानंतर काही नगरसेवकांनी आक्रमक होत त्याच्या दिशेने धाव घेतली. सर्वांनी मिळून त्याला सभागृहातून बाहेर काढले.

ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्याला सभागृहात प्रवेश देण्यात येणार नाही. याबाबत कायदेशीर मार्गाने अजेंड्यावर विषय घेऊन निर्णय घ्यावा. यापूर्वीही त्याला त्याचे पद रद्द करून सभागृहातून काढून टाकले होते. याबाबत आता पुन्हा ठराव करण्यात यावा. पुढच्या सभेत हा विषय अजेंड्यावर नसेल, तर आम्ही सभागृहात थांबणार नाही, असा इशारा संपत बारस्कर व इतर नगरसेवकांनी दिला.

हे सुद्धा वाचा :  वडगाव सावताळ येथे तमाशा कलावंतांवर जीवघेणा हल्ला, काय घडलं पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ