- जाहिरात -spot_img

गुन्हेगारांचा बिमोड करा; दबावाला भीक घालू नका, काय म्हणाले आयजी पहा

गुन्हेगारी टोळ्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे महानिरीक्षक येनपुरे यांचे आदेश
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत असून, गुन्हेगारी टोळ्यांचा कोणताही राजकीय दबाव न घेता कठोरपणे बिमोड करा. कायद्याच्या अंमलबजावणीत कोणीही अडथळा आणत असेल तर त्याची पर्वा करू नका. कायद्याने जे योग्य आहे तेच करा. गुन्हेगारांवर कारवाई करताना कोणताही दबाव झुगारून काम करा. अशा कारवाईत कोणत्याही अधिकाऱ्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू, असा स्पष्ट संदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना दिला.

श्रीरामपूर येथील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या खूनप्रकरणानंतर शहरात सलग चार दिवस बंद पाळण्यात आला होता.
या घटनेनंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक येनपुरे बुधवारी (15 जुलै) अहिल्यानगरला आले होते. त्यांनी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील गुन्हेगारीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.बैठकीत जिल्ह्यात डोके वर काढणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा गुन्हा घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्याच्या सूचना येनपुरे यांनी दिल्या.

सराईत गुन्हेगारांवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्यावर सतत नजर ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. अवैध शस्त्रांचा वाढता वापर लक्षात घेऊन गावठी कट्टे व इतर बेकायदेशीर शस्त्रांविरोधात जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अवैध शस्त्रांचा पुरवठा करणारे, त्यांचा वापर करणारे आणि गुन्हेगारी टोळ्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहिला
पाहिजे; दबावाला भीक घालू नका
गुन्हेगारांना वाचविण्यासाठी जर कोणत्याही राजकीय व्यक्तीकडून अथवा अन्य कोणाकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, तरी त्याला भीक घालू नका. पोलिसांनी केवळ कायद्याच्या चौकटीत राहून निष्पक्ष कारवाई करावी. गुन्हेगारांवर कायद्याचा धाक कायम राहिला पाहिजे. कायद्याची भीती संपली तर गुन्हेगारी वाढेल आणि त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागतील. कारवाई करताना अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास वरिष्ठ स्तरावरून संपूर्ण पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तुम्ही निःपक्षपातीपणे काम करा, कायद्याची अंमलबजावणी करताना कोणताही दबाव घेऊ नका. योग्य कारवाई करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असेही येनपुरे यांनी बैठकीत सांगितले.

हे सुद्धा वाचा :  हिंदू विरोधातील जिहाद्यांचे षडयंत्र वेळीच ओळखा; भविष्यात जिहाद्यांपासून हिंदूंना मोठा धोका, आ.संग्राम जगताप काय म्हणाले पहा
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com