- जाहिरात -spot_img
breaking news

वासुंदेत चालकावर प्राणघातक हल्ला; काय घडलं पहा…

एक जण गंभीर जखमी | घटनेनंतर २० तास उलटूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे ओमिनी चालकावर पूर्ववैमनस्यातून धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ४ मे) रात्री १० च्या सुमारास घडली. एकनाथ लक्ष्मण हिंगडे (वय ४५, रा. वासुंदे) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे वासुंदे व टाकळी ढोकेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ हिंगडे यांच्या राहत्या घरासमोरील आंब्याच्या बागेत आरोपी आधीपासूनच लपून बसला होता. संध्याकाळच्या वेळेत त्याने एकनाथ हिंगडे यांच्यावर अचानक पाठीमागून कोयत्याने वार केले. संबंधित आरोपीने यापूर्वी दोन वेळा जीव घेणे हल्ले केले आहेत.सोमवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर तब्बल २० तास उलटूनही पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता, त्यांना समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

त्यामुळे ’हा मुजोर गुन्हेगार कोणाच्या आश्रयाने मोकाट फिरत आहे?’ असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित गुन्हेगार दिवसभर तोंड बांधून एकनाथ हिंगडे यांच्या घराभोवती पाळत ठेवून होता. या गंभीर प्रकारानंतरही पोलीस यंत्रणा कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी हिंगडे यांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सराईत गुन्हेगाराकडून तिसर्‍यांदा जीवघेणा हल्ला
यापूर्वीही आरोपीने दोन वर्षांपूर्वी घरी येऊन एकनाथ हिंगडेवर जीवघेणा हल्ला केला होता तसेच गेल्या एक महिन्यापूर्वी ही कोयत्याने हल्ला केला होता. अशाप्रकारे यापूर्वी दोनदा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दरवेळी त्याला केवळ समज देऊन सोडून दिले. आता तिसर्‍यांदा कोयत्याने जीवघेणा हल्ला करून २० तास उलटून गेले, तरी पारनेर पोलीस कोणताही गुन्हा दाखल करत नाहीत आणि उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. गुन्हेगार मोकाट फिरत आहे, मग या गुन्हेगाराला अश्रय कोणाचा आहे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

हे सुद्धा वाचा :  कर्जत-जामखेड मध्ये डिजिटल शैक्षणिक क्रांती, साडे नऊ कोटींचे साहित्य...

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ