- जाहिरात -spot_img
breaking news

टाकळी ढोकेश्वर आरोग्य केंद्राचे नूतनीकरण करा …

आमदार काशिनाथ दाते यांची विधानसभेत मागणी
पारनेर/नगर सह्याद्री :
 पावसाळी अधिवेशनात सन २०२६-२७ च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होत  आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेशी संबंधित विविध महत्त्वाचे प्रश्न विधानसभेत उपस्थित केले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी टाकळी ढोकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे तातडीने नूतनीकरण करावे, अशी ठाम मागणी त्यांनी शासनाकडे केली.
सार्वजनिक आरोग्य विभागावरील चर्चेत बोलताना आमदार दाते यांनी टाकळी ढोकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राची सध्याची अवस्था सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही इमारत जीर्ण झाली असून अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अपुऱ्या जागा, दुरवस्था आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांच्या कमतरतेमुळे रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
या आरोग्य केंद्रातून टाकळी ढोकेश्वरसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना सेवा दिली जाते. त्यामुळे या इमारतीचे तातडीने नूतनीकरण करून आधुनिक वैद्यकीय सुविधा, आवश्यक मनुष्यबळ आणि अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचाही मुद्दा उपस्थित करत, नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी जोरदार मागणी केली. ग्रामीण विकास, आरोग्य आणि शेती क्षेत्रातील प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हे सुद्धा वाचा :  शहराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर, कोणती कामे होणार पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ