- जाहिरात -spot_img
breaking news

टाकळी ढोकेश्वरमधील विरोधानंतर नव्या जागांची चाचपणी….सभापती ॲक्शन मोडमध्ये

पारनेर | नगर सह्याद्री
टाकळी ढोकेश्वर येथे प्रस्तावित उपबाजार समितीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवल्यानंतर, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर यांनी इतर ठिकाणी पर्यायी जागा शोधण्यास वेगाने सुरुवात केली आहे. टाकळी ढोकेश्वरपासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या कासारे फाटा तसेच कर्जुले हर्या येथील औद्योगिक वसाहतींच्या जागांची पाहणी सभापती बेलकर यांनी सहकाऱ्यांसह केली.

पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात एक हक्काची उपबाजार समिती असावी, ही गेल्या 25 वर्षांपासूनची स्थानिक शेतकऱ्यांची जुनी आणि हक्काची मागणी आहे. त्यानुसार टाकळी ढोकेश्वर येथील गायरान क्षेत्रावर बाजार समितीसाठी मोजणी देखील करण्यात आली होती. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी या जागेवर बाजार समिती होण्यास विरोध केल्यामुळे प्रशासनाला आपला निर्णय बदलावा लागला. या विरोधानंतर आता तालुक्यात इतरत्र जागा मिळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

टाकळी ढोकेश्वरचा विरोध पाहता, आता कर्जुले हर्या, सावरगाव, वासुंदे, खडकवाडी आणि वडगाव सावताळ या गावांमधून उपबाजार समितीसाठी जागा उपलब्ध होऊ शकते. या भागातील स्थानिक ग्रामस्थ आता स्वतःहून सभापती गंगाराम बेलकर यांच्याशी संपर्क साधत असून, बाजार समिती आपल्याच भागात व्हावी, अशी मागणी करत आहेत.सभापती गंगाराम बेलकर यांनी नुकतीच कासारे फाटा आणि कर्जुले हर्या येथील संभाव्य जागांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्याप्रसंगी बाजार समितीचे सचिव सुरेश आढाव, माजी उपसभापती बापूसाहेब शिर्के, सचिन वाफारे, शिवाजी वाफारे, शरद उंडे, भरत आंधळे, रामदास शिर्के, गंगाराम उंडे, संतोष उंडे, उत्तम आंधळे, वसंत आंधळे, शशिकांत आंधळे, हरी उंडे, मयुर आंधळे, साहेबराव आंधळे, महादू उंडे, हरिभाऊ शिर्के, सचिन आंधळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही उपबाजार समिती लवकरच योग्य ठिकाणी आकारास येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

टाकळी ढोकेश्वरकरांनी पुनर्विचार करावा
40 ते 50 गावांचा संपर्क असल्याने टाकळी ढोकेश्वरला उपबाजार समिती व्हावी, ही या भागातील शेतकऱ्यांची विशेष मागणी आहे परंतु स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे आम्ही इतर ठिकाणी जागेची चाचपणी करत आहोत, टाकळी ढोकेश्वरकरांनी पुनर्विचार करावा व जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे.
– गंगाराम बेलकर, सभापती, पारनेर

हे सुद्धा वाचा :  MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला तर मुलींमध्ये आरती अव्वल
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ