- जाहिरात -spot_img
breaking news

ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप!, अजित पवार गटाचे २० आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात अनेक दिवसांपासून दोन राष्ट्रवादीच्या विलनीकरणाची चर्चा सुरु आहे. मात्र अशातच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील १५ ते २० आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता बारामती पोट निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान हे आमदार शरद पवार गटात प्रवेश करणार का? या चर्चांना आता उधाण आलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला अजित पवार यांच्या गटातील काही नेत्यांनी विरोध केला, मात्र असं असतानाच अजित पवार गटाच्या एका मंत्र्याने शरद पवार यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केल्याची माहिती आहे. तसेच अजित पवार गटातील १५ ते २० आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान या भेटीमुळे राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पक्षातील सतत होणाऱ्या वादामुळे अनेक आमदार अस्वस्थ झाले आहेत. तसेच या आमदारांना भविष्यातील आपल्या राजकारणातील भवितव्याबाबत चिंता भेडसावत आहे. मतदारसंघात अंतर्गत वादामुळे जनसंपर्क आणि प्रभाव कमी होण्याची भीती आमदारांकडून व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे काही आमदार पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असून शरद पवार यांच्याशी जवळीक वाढवण्याच्या पर्यायांचा विचार करत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता हे आमदार अजित पवार यांची राष्ट्रवादी सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे सुद्धा वाचा :  अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन झुरळांना पाठिंबा द्यावा; खा. संजय राऊत काय म्हणाले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ