पारनेर | नगर सह्याद्री
विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 23) पारनेर शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले पुतळा परिसरातून मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चात विद्याथ, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी निलेश खोडदे, श्रीकांत पठारे, बंडू गायकवाड, राया औटी, अमित जाधव, सतीश म्हस्के, अँड.गणेश कावरे, राजू शेख, बाळासाहेब औटी, सहदेव तराळ, शंकर नगरे, राजू करंदीकर, राजू शेरकर, परे बाळासाहेब मते, पै.चंद्रकांत कावरे, मयुर कावरे, विनोद गोळे, अविनाश औटी, संभा थोरे, निलेश वाखारे, सचिन नगरे, अमोल ठुबे, शत्रुघ्न नवघणे, अमोल दुधाडे (सरपंच), किसन सुपेकर, शिवाजी लाळगे, संदीप मोढवे, दत्ता कावरे, नितीन आहेर, शुभम पाडळे, राहुल बुगे, संतोष चेडे, सतीश औटी, दिनेश कावरे, अतुल शेटे, अभिषेक औटी, अर्जुन खोडदे बाळासाहेब औटी आदी उपस्थित होते.










