- जाहिरात -spot_img
breaking news

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई / नगर सह्याद्री :
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकारचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांनी आज रविवारी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने गायन क्षेत्रातील सुमधुर आवाज हरपला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जात होते. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिला. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांचा चाहतावर्ग देखील मोठा आहे.

चार वाजता होणार अंत्यसंस्कार
आशाताईंवर (सोमवारी) सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा :  सुपारी देऊन मुलीनेच केली आईची हत्या; वर्षभरापूर्वी वडिलांनाही संपवल्याचा संशय, धक्कादायक कारण समोर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ