- जाहिरात -spot_img
breaking news

करंजी घाटात थार-अ‍ॅपेरिक्षाची धडक; रिक्षाचालक जागीच ठार, काय घडलं

पाथर्डी | नगर सह्याद्री
नगर-पाथर्डी राष्ट्रीय महामार्गावर महेंद्रा थार आणि अ‍ॅपे रिक्षाची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात अ‍ॅपेरिक्षाचा चालक यशवंत पुरी हा जागीच ठार झाला. हा अपघात एवढा भयानक होता की, रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

नगर ते पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात सकाळी भरधाव वेगाने नगरकडे जात असलेल्या महेंद्रा थार (एम एच १२झेड एल ७२५०) गाडीची आणि नगरहून पाथर्डीकडे येत असलेल्या अ‍ॅपेरिक्षाची (एम एच १२-टी यु-४५०६) वळणाचा अंदाज न आल्याने जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात रिक्षाचा चालक यशवंत बन्सी पुरी रा. पुणे) हा जागीच ठार झाला.

हा अपघात एवढा भीषण होता की, अ‍ॅपेरिक्षाचा जागीच चक्काचूर झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पाहून प्रवाशी मात्र निघून जात होते. अपघातानंतर सुदैवाने थार गाडी डोंगराच्याकडेला खड्ड्यात गेली. अपघाताची माहिती मिळताच करंजी औटपोस्टचे पोलीस कर्मचारी अल्ताफ शेख यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना मदत केली. या घटनेचा गुन्हा पाथर्डी पोलीस स्टेशनला दाखल झाला.

हे सुद्धा वाचा :  नगरमध्ये सव्वा कोटींची लाल सुपारी जप्त; दोन ट्रक ताब्यात
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ