- जाहिरात -spot_img
breaking news

तुला अक्कल नाही का?; जान्हवी छोटा पुढारीवर भडकली, वादाची सोशल मिडियावर रंगली चर्चा

मुंबई / नगर सह्याद्री –
‘बिग बॉस मराठी 5’ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर तिच्या बेधडक स्वभावामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच ती अभिनेता ओम यादव आणि कुटुंबीयांसोबत जेजुरीला गेली होती. ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला.

मात्र तिच्या या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी नात्यावरून कमेंट्स केली. यातच ‘बिग बॉस मराठी’ फेम छोटा पुढारीनेही संधी साधली. त्यानेही या व्हिडीओवर अशी कमेंट केली, जे वाचून जान्हवीचा पारा चांगलाच चढला. यावरून तिने छोटा पुढारीला चांगलेच सुनावले आहे.

जेजुरीत एकत्र दर्शन घेतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, छोटा पुढारीने जान्हवी आणि ओमच नाव एकमेकांसोबत जोडलं. “नक्कीच तुमची छान मैत्री असू शकते. पण, ज्या प्रमाणात तुमचे व्हिडिओ येत आहेत यावरून लोकांना प्रश्न पडणारच ना.. बाकी तुमचं जे असेल ते ‘ अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्यानंतर छोटा पुढारी म्हणाला ‘ ओम दादा हे बरोबर नाही बरं ..तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे. मी तुमचा लहान भाऊ आहे,त्यामुळे मला काय बोलायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल.पण देवाला आमचा एक निरोप द्या..आम्हाला पण एक वहिनी आली पाहिजे आता ‘ अशी कमेंट त्याने केली आहे.

यावर ओम यादवनं ‘ नक्कीच घनश्याम. तू लग्न केलंस की मी लगेच करणार लग्न, प्रॉमिस’ असं म्हटलं. पण जान्हवीला छोट्या पुढारीचा हा आगाऊपणा अजिबात आवडला नाही. कमेंट सेक्शनमध्येच जान्हवीने छोटा पुढारीला सुनावलं.

जान्हवी किल्लेकरने म्हंटले की, ‘जास्त शहाणपणा करू नकोस, लोकांचे ठीक आहे ..पण तुला अक्कल नाही का ? असं ती म्हणाली. जान्हवीच्या कमेंटनंतर अनेक जण छोटा पुढारीला ट्रोल करू लागले. शेवटी ओम यादवला या व्हिडिओवर कमेंट करत स्पष्टीकरण द्यावं लागलं.

ओम यादव म्हणाला ‘अति उत्सुक कमेंट करणारे, अरे थांबा थांबा.. कन्फ्युज होऊ नका. आम्ही फक्त एकमेकांना सपोर्ट करणारे फक्त आणि फक्त बेस्ट फ्रेंड आहोत आणि कायम राहू. इव्हेंट निमित्त महाराष्ट्रभर आम्ही जात असतो. तात्या भागातील देवस्थानांचा दर्शन आम्ही घेत असतो. तसंच जेजुरीला देखील देवदर्शन केलं. जान्हवीचं पूर्ण कुटुंब देखील सोबत होतं. आमची मैत्री एकदम क्लिअर आहे. कलाकार म्हणून आमचा एकमेकांना कायम सपोर्ट करत असतो व तो कायम असेल.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य १७ मे २०२६

आणखी एक गोष्ट. इव्हेंटला गेल्यावर आयोजकांची इच्छा असते की दोघांनी काहीतरी डान्स परफॉर्मन्स केला पाहिजे. आम्हालाही आयोजक व प्रेक्षक नाराज करता येत नाहीत. कारण शेवटी आयोजकांनी लाखो रुपये मोजलेले असतात. नंतर रीलचे व्हिडिओ व्हायरल होतात पण ते कलाकार म्हणून समजून घ्या. प्रेक्षकांची फेवरेट जोडी म्हणून सर्वांना आम्ही आवडतो, याचा आम्हाला आदरच आहे व कायम राहील. कमेंट करताना याचे भान ठेवावे ही विनंती,’ असं ओम यादव म्हणाला. मात्र जान्हवी आणि छोटा पुढारीच्या या वादाची सोशल मिडियावर चर्चा रंगली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ