पारनेर | नगर सह्याद्री
सततचे सार्वजनिक कार्यक्रम आणि कडायाच्या उन्हातील धावपळीमुळे प्रकृती अस्वस्थ जाणवू लागल्याने, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांना पुढील उपचार आणि रुटीन तपासण्यांसाठी पुण्याच्या रुबी हॉल लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे.
गेल्या दोन-चार दिवसांपासून खासदार लंके यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यामुळे खबरदारी म्हणून आणि शरीरातील थकवा लक्षात घेता, डॉटरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या काही रुटीन तपासण्या करण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना काही दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचे सांगण्यात आले आहे. आपल्या तब्येतीबाबत माहिती देताना खासदार लंके यांनी कळवले आहे की, रुटीन तपासण्या आणि योग्य उपचारांनंतर मी लवकरच पुन्हा एकदा आपल्या सेवेत पूर्ण क्षमतेने उपस्थित होईन. जनतेचे आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे कुणीही काळजी करू नये., उपचार आणि विश्रांती पूर्ण करून खासदार लंके लवकरच अहिल्यानगरमध्ये पुन्हा सक्रिय होतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.










