स्व. दिलीपराव ठुबे यांनी सुरू केलेली परंपरा कायम, ३१ मार्च रोजीच ताळेबंद जाहीर
कान्हूर पठार | नगर सह्याद्री
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणार्या कान्हूर पठार (ता.पारनेर) येथील कान्हूर पठार पतसंस्थेने स्व.दिलीपराव ठुबे यांनी सुरू केलेली परंपरा कायम ठेवत ३१ मार्च रोजीच आर्थिक पत्रके जाहीर केले आहे.
या आर्थिक वर्षात संस्थेस ११ कोटी ६२ लाख रूपयांचा ढोबळ नफा झाला आहे. सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा ३ कोटी ९० लाख रूपयांचा झाला आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल २००० कोटी व खेळते भांडवल ८७७ कोटी असल्याची माहिती संस्थेच्या कार्यकारी संचालिका नमिता ठुबे यांनी दिली.
संस्थेच्या अध्यक्षा सुशीला ठुबे म्हणाल्या की, संस्थेने तीन कोटी रुपयांची एनपीए तरतूद केली आहे. संस्थेने ग्राहकाभिमुख सेवा देताना बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून कोअर बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे.त्यानुसार संस्थेने ग्राहकांना आरटीजीएस, एसएमएस सेवा सर्व शाखांमधून ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. यासोबत लाईट बिल भरणा, मोबाईल व डीश टीव्ही रिचार्ज या सेवाही उपलब्ध करून दिल्या आहेत.सुरक्षिततेला अधिक महत्व देत संस्थेने स्वतःचे डाटा सेंटर सुरू केले आहे. लवकरच युपीआय कोडद्वारे खात्यात पैसे ही सुविधाही सुरू करणार आहे.
संस्थेच्या बारा शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत. अशा प्रकारे संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय सक्षम आहे. त्यामुळे संस्थेचे आर्थिक व्यवहार दिवसेंदिवस वाढत असून, संस्था प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पी.के ठुबे, संचालक सुभाष नवले, राजेंद्र व्यवहारे, सुहास शेळके, भास्कर ठुबे, मधुकर साळवे, संपत खरमाळे, भोमा ठुबे, राजेंद्र रोकडे, भगवान वाळुंज, गवराम गाडगे, पो.मा.झावरे, दादाभाऊ नवले, मंगेश गागरे आदी उपस्थित होते.










