- जाहिरात -spot_img
breaking news

ज्याची भीती होती तेच घडलं; भारताला सर्वात मोठा धक्का..

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केला आहे. सध्या स्थितीमध्ये इराणकडून या मार्गाने केवळ मित्र राष्ट्रांच्याच जहाजांना जाण्याची परवानगी देण्यात येत आहे. मध्य पूर्वेत उडालेल्या युद्धाच्या भडक्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.

आता त्याचा थेट फटका भारताला बसताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय चलनामध्ये घसरण सुरूच असून, शुक्रवारी रुपयामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रेकॉर्डब्रेक घसरण झाली आहे. रुपया पहिल्यांदाच प्रति डॉलर 94 रुपयांच्या पार पोहचला आहे. दिवसाच्या शेवटी काही वेळ रुपयाचं मूल्य हे प्रति डॉलर 94.84 वर पोहोचलं होतं, त्यानंतर रुपयामध्ये थोडी सुधारणा दिसून आली, त्यानंतर 94.81 रुपयांवर क्लोज झाला, ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे.

परदेशी गुंतवणूकदार सातत्यानं कमी करत असलेली गुंतवणूक आणि इराण, अमेरिका, इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाचा भारतीय चलनावर मोठा परिणाम होत असल्याचं पहायला मिळत आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर या आर्थिक वर्षामध्ये रुपयात तब्बल 11 टक्के घसरण झाली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये देखील रुपयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली नव्हती, हा नवा रेकॉर्ड तयार झाला आहे, त्यामुळे आता आर्थिक जगतामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

रुपयामध्ये घसरणीचं कारण काय?
अर्थतज्ज्ञांच्या मते कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सतत बदल होत आहे, याचा मोठा परिणाम हा भारतीय चलनावर दिसून येत आहे, दरम्यान पुढील काही आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर असं झालं तर रुपयाच्या मुल्यामध्ये आणखी घसरण पहायला मिळू शकते. यामुळे महागाई देखील वाढण्याची शक्यता आहे.

जगावर मोठं इंधन संकट
दरम्यान या युद्धामुळे जगभरात मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. इराणने स्ट्रीट ऑफ होमूर्ज बंद केल्यामुळे अनेक देशांना होणारा कच्च्या तेलाचा आणि नॅचरल गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे. भारताला देखील याचा मोठा फटका बसला आहे.

हे सुद्धा वाचा :  बासरी लॉजिंग प्रकरणात फेरतपासाचे न्यायालयाचे आदेश, हलगर्जीपणावर ताशेरे
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ