जायकवाडी धरण उशिरा भरणार
शेवगाव | नगर सह्याद्री
ग्लोबल वार्मिंगमुळे आता निसर्ग 22 दिवस पुढे सरकला आहे. त्यामुळे यापुढे पारंपरिक तारखांना पडणारा पाऊस 22 दिवस पुढे सरकल्याचा हा बदलता पॅटर्न शेतकऱ्यांनी कायमचा वहीत लिहून ठेवावा आणि कोणालाही पावसाचा अंदाज विचारू नये. यावष जायकवाडी धरण लवकर भरणार नसून, भरले तर पार शेवटी भरेल, असा अंदाज प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डखयांनी वर्तविला आहे.
शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी केली. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून पंजाबराव डख बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामदैवत जगदंबा माता, भव्य अश्वारूढ शिवस्मारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि पुण्यलोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दहावी बारावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ.संदीप जरे यांनी मनोगत व्यक्त करत अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा दिला.
कार्यक्रमासाठी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. के.वाय.नजन, जगदंबा माता मंदिराचे महंत अशोक महाराज बोरुडे शास्त्री, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश खरड, माजी प्राचार्य त्र्यंबक जाधव, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर, माजी सरपंच रवी व्यवहारे, पोलिस उपनिरीक्षक बुधा शिंदे, जगदंबा माता पतसंस्थेचे चेअरमन दादासाहेब जेधे, युवा नेते विष्णू मुंजाळ, डॉ.शंकर जाधव, नानासाहेब काटे, तुकाराम चेडे, भागवत जरे, गवाजी मुंजाळ, लक्ष्मण खर्जुले, शाम खर्जुले, श्रीराम मुंजाळ, रामकृष्ण मुंगसे, माजी सैनिक कुमार शिंदे, अण्णासाहेब काटे यांच्यासह विविध क्षेत्रातील व पंचक्रोशीतील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.नंदकुमार शेळके यांनी केले, तर सूत्रसंचालन, आभार राजू शिंदे यांनी मानले.










