- जाहिरात -spot_img
breaking news

तक्रार मागे न घेतल्याने प्राणघातक हल्ला; काय घडलं पहा

मनपातील तक्रारीचा राग; नगर-पुणे रोडवर तरुणाचा लोखंडी रॉडने खुनी हल्ला
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री
महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामाची तक्रार मागे न घेतल्याच्या रागातून एका ५७ वर्षीय व्यक्तीवर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना नगर-पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकाजवळील सर्व्हिस रोडवर घडली. याप्रप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​प्रमोद उद्धवराव कुलकर्णी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी दीपक साहेबराव खैरे याने बांधलेल्या अनधिकृत पत्रा शेडविरोधात कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी महानगरपालिकेत तक्रार केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी खैरे त्यांच्यावर सतत दबाव टाकत होता. तसेच त्यांचा भाऊ सतीश यालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. या त्रासाबाबत कुलकर्णी यांनी समाजमाध्यमावर पोस्ट टाकली होती, याचा राग आरोपींच्या मनात होता.

​५ एप्रिल रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास कुलकर्णी हे आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना, दीपक खैरे याच्या सांगण्यावरून त्याचा मुलगा कृष्णा दीपक खैरे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी कुलकर्णी यांना गाठले. यावेळी आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने त्यांना बेदम मारहाण केली. यात कुलकर्णी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथील संचेती रुग्णालय आणि अहिल्यानगरमधील पॅसिफिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी केली मोहीम फत्ते...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ