- जाहिरात -spot_img
breaking news

भीमा नदीच्या वाढत्या पाणीपातळीने आर्वी बेटाचा संपर्क तुटला…

प्रशासन सतर्क, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

श्रीगोंदा | नगर सह्याद्री

अहिल्यानगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदीला दौंड येथील पुलावरून सोमवारी सायंकाळी 6 वाजता 52 हजार 137 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने श्रीगोंदा तालुक्यातील भीमा नदीपात्रातील आर्वी बेटाकडे जाणारा बंधाऱ्याचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. मंगळवारी सकाळी 1 लाख 60 हजारने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बेटाचा संपर्क तुटला असून प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

सुमारे 400 एकर क्षेत्रफळ असलेल्या आर्वी बेटावर 185 नागरिक वास्तव्यास आहेत. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन बेटावरील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने एक रबर बोट उपलब्ध करून दिली असून महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. भीमा नदीच्या पाणीपातळीत होत असलेल्या बदलांवर महसूल विभागाकडून नियमितपणे निरीक्षण केले जात असून, आवश्यकतेनुसार तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.तहसीलदार सचिन डोंगरे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.

सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर टाळावा, पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून किंवा नदीपात्रातून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही तहसीलदार डोंगरे यांनी केले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

हे सुद्धा वाचा :  दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्याने वाद, तरुणावर कोयत्याने हल्ला, विहिरीच्या वादातून राडा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ