- जाहिरात -spot_img
breaking news

कांदा उत्पादक अडविणार नगर-कल्याण महामार्ग; नेमकं कारण काय पहा

शेतकर्‍यांचे १५ मे रोजी रस्ता रोको आंदोलन; जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन
पारनेर | नगर सह्याद्री-
पारनेर येथे दि. १५ मे रोजी कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर-कल्याण महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची पूर्वकल्पना देणारे निवेदन पक्षाचे नेते रवींद्र राजदेव आणि गटाच्या नेत्या सोनिया राजदेव यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते यांना सुपूर्द करण्यात आले. निवेदन सादर केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी प्रशासनाशी चर्चा करून शेतकर्‍यांच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष वेधले.

गेल्या काही महिन्यांत कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रचंड आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सोलापूर या प्रमुख जिल्ह्यांमध्ये कांदा हे मुख्य नगदी पीक मानले जाते. यंदाच्या हंगामात चांगल्या पावसामुळे उत्पादन वाढले असले, तरी बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे भाव मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. सद्यःस्थितीत शेतकर्‍यांना प्रति क्विंटल केवळ ८०० ते १५०० रुपये भाव मिळत आहे, जो बी-बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि वाहतूक या एकूण उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती खालावली असून, त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

रवींद्र राजदेव यांनी अपर जिल्हा दंडाधिकारी गीते यांच्यासोबत सुमारे चाळीस मिनिटे सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या समस्यांचा पाढा वाचला. निवेदनात प्रामुख्याने कांद्याला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) जाहीर करावी, कांदा निर्यातीवरील बंदी तत्काळ उठवून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळावा, जिल्ह्यांतर्गत कोल्ड स्टोरेज सुविधांचा विस्तार करावा, नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज द्यावे, ई-नामसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून थेट बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि कांदा प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावर अपर जिल्हा दंडाधिकारी गिते यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या आणि समस्या त्वरित राज्य शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. शासन स्तरावर यावर योग्य तो विचार करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत १५ मे रोजीचा रस्ता रोको शांततापूर्ण मार्गाने होणार असल्याचे रवींद्र राजदेव यांनी स्पष्ट केले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत होण्याची शयता आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या वाढत्या संकटांमुळे आणि आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तातडीने समन्वयाने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शयता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा :  दर पाच वर्षांनी वृद्धेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांची निवड ; उच्च न्यायालयाचा निकाल; तीन महिन्यांत नवीन विश्वस्तांची निवड
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ