- जाहिरात -spot_img
breaking news

पार्थ पवार–कायनात धार लवकरच अडकणार विवाह बंधनात; साखरपुड्याची तारीख आली समोर

मुंबई / नगर सह्याद्री –
पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच आणखी एका शुभकार्याची नांदी होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचा विवाह सोहळा पार पडला होता. यानंतर आता खासदार पार्थ पवार यांचा विवाह देखील लवकरच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रेवती सुळेंच्या विवाहसोहळ्यात पार्थ पवार यांच्यासोबत कायनात धार यांनी हजेरी लावली होती. या उपस्थितीनंतर पार्थ आणि कायनात यांच्या नात्याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता त्यांच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्याने चर्चा अधिकृत झाली असून पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा २९ जुलै रोजी पुण्यात पार पडणार आहे.

कायनात धार या गेल्या काही काळापासून पार्थ पवार यांच्यासोबत अनेक सार्वजनिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. त्यावेळचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्यांविषयी चर्चांना उधाण आले होते.

कायनात यांनी केवळ आनंदाच्या क्षणीच नव्हे, तर पवार कुटुंबाच्या कठीण काळातही उपस्थिती दर्शवली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील सांत्वन भेट तसेच मुंबईतील शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही त्या उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांचे पवार कुटुंबाशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध सातत्याने चर्चेत राहिले.

कोण आहेत कायनात धार?
कायनात धार या मूळच्या हरियाणातील असून सध्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. त्या पार्थ पवार यांच्यासोबत अनेकदा दिसल्याने त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. आता २९ जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या साखरपुड्यामुळे या चर्चांवर शिक्कामोर्तब होणार आहे. पवार कुटुंबातील आणखी एका आनंदसोहळ्याकडे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा :  कॅमेरासमोर काहीही दिसत नसले तरी आतमध्ये बरेच काही घडते...; अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ