- जाहिरात -spot_img
breaking news

संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे मिडसांगवी मध्ये पहिले रिंगण

पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान.
खरवंडी कासार / नगर सह्याद्री
हरिनामाचा जयघोष टाळ मृदुंगांच्या नादात श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण सोहळा पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे पार पडला. श्रीक्षेत्र पैठण येथून निघणाऱ्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे पहिले रिंगण सोहळ्याचा मान दरवर्षी प्रमाणे मिडसांगवी येथे पार पडतो. या पालखीमध्ये खानदेश, विदर्भ, मराठवाडा मधुन अनेक दिंड्या सहभागी झाल्या आहेत.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 38;

पालखी मिडसांगवी गावच्या सरहद्दीवर आल्यानंतर सालसिद्ध बाबा संस्थांनचे महंत हनुमंत महाराज शास्त्री व समस्त गावकऱ्यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण गाव परिसरामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली. व त्यानंतर दुपारी तीन वाजता पहिले रिंगण पुष्प पार पडले. या सोहळ्यामध्ये अश्व रिंगणी धावले. यावेळी गावकऱ्यांसह भाविकांचा आनंद द्विगुनीत झाला होता. यावेळी वारकऱ्यांसह आलेल्या सर्व परिसरातील भाविकांना बाबुराव पठाडे यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला. पालखीला निरोप देण्यासाठी खरवंडी कासार परिसरातील सर्व भाविकांनी हजेरी लावली. यावेळी संत एकनाथ महाराजांचे 11 वे वंशज रघुनाथ महाराज सह सालसिद्ध बाबा संस्थांनचे महंत हनुमंत महाराज शास्त्री प्रांताधिकारी प्रसाद मते साहेब, तहसीलदार उद्धव नाईक सह पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, मंडळ अधिकारी सोनवणे, तलाठी निलवडे, कदम मॅडम, ग्रामसेवक दातीर भाऊसाहेब सह परिसरातील सर्व भाविक हजर होते.

हे सुद्धा वाचा :  छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार : आमदार सत्यजीत तांबे
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ