- जाहिरात -spot_img
breaking news

नगर-दौंड महामार्गावर भीषण अपघात, दोन वाहने जाळून खाक, काय घडलं…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर – दौंड महामार्गावर खंडाळा शिवारात 11 जुलै रोजी पहाटे 5.45 च्या सुमारास दोन मालट्रकची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही ट्रक ने पेट घेतला. ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. या आगीत दोन्ही मालट्रक व त्यामधील माल जळून खाक झाला असून लाखोंचे नुकसान झाले आहे. या अपघातात एक ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नगर-दौड महामार्गावर खंडाळा परिसरात माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या घरासमोर हा भीषण अपघात झाला.

एक मालट्रक (क्र. एमएच 16 एई 0860) नगर एमआयडीसी मधील कंपनी मधून लोखंडी जॉब घेवून दौंड कडे चालला होता. तर दुसरा मालट्रक (क्र.एमएच 18 बीझेड 7352) कापडाचे गठ्ठे घेवून दौंड कडून नगर मार्गे धुळ्याकडे चालला होता. पहाटे 5.45 च्या सुमारास दोन्ही मालट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघाचा मोठा आवाज आल्यानंतर कार्ले कुटुंबीय व परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. नगरच्या मालट्रक चा चालक सोमनाथ नागरगोजे (रा. वडगाव, ता. पाथड) हा केबिनच्या काचा फोडून बाहेर पडला. तर धुळ्याकडे चाललेल्या ट्रक चालक संजय दावर (रा.शिरपूर, सेंदवा, मध्यप्रदेश) यास संदेश कार्ले व इतरांनी केबिन मधून बाहेर काढत तो गंभीर जखमी असल्याने स्वतःच्या गाडीतून उपचारासाठी नगरला पाठविले. अपघातानंतर काही वेळात एका ट्रकच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट होवून दोन्ही वाहनांना मोठी आग लागली.

कार्ले यांनी तात्काळ अहिल्यानगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला व पोलिसांना कळवले. मालट्रक मध्ये कापड असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. तातडीने अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. कार्ले यांनी त्यांच्या शेतातील वीज पंप सुरु करून या गाड्यांना पाण्याचा पुरवठा केला. एक ते दीड तासांच्या परिश्रमांनंतर आग विझली. मात्र तो पर्यंत दोन्ही वाहने आणि त्यातील साहित्य जळून खाक झाले होते. नगर तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त वाहने जेसीबीच्या सहाय्याने व कार्ले तसेच इतरांच्या मदतीने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

हे सुद्धा वाचा :  वाढीव मालमत्ता कर नोटिसांवर नगरसेवक योगीराज गाडेंचा आक्षेप

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ