- जाहिरात -spot_img
breaking news

सोन्याच्या दरात मोठी घसरण, आजचे दर किती, पहा..

मुंबई / नगर सह्याद्री –
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २९,४०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरात देखील १०० रुपयांची घसरण झाली. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या…

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं २९४० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,४५,९७० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २९,४०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं आज १४,५९,७०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

२२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं २,७५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,३३,८०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं २७,५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १३,३८,००० रुपये खर्च करावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं २,२५० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०९,४८० रुपये खर्च करावे लागतील. तर १८ कॅरेटचे १० तोळा सोनं २२,५०० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,९४,८०० रुपये खर्च करावे लागतील. आज २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे खरेदीची चांगली संधी आहे.

हे सुद्धा वाचा :  दहावी, बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची अपडेट, या दिवशी लागणार
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ