- जाहिरात -spot_img
breaking news

दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करू नका

खासदार लंके यांचा टोला; कान्हूर पठार येथे संयुक्त जयंती साजरी
कान्हूरपठार | नगर सह्याद्री

दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करू नये, आपण स्वतःमंजूर करून आणलेल्या कामांचे उद्घाटन करावे, असा टोला खा. निलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला. कान्हूर पठार (ता.पारनेर) येथे निलेश लंके प्रतिष्ठानमार्फत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

खा. लंके म्हणाले, पारनेर बसस्थानक इमारत, न्यायालय इमारत, पळशी आश्रमशाळा या कामांना मी निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचे श्रेय घेऊ नये, त्यांनी मंजूर केलेल्या कामांचेच उद्घाटन त्यांनी करावे. गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. शेतकऱ्यांसाठी लढणारे कार्यकर्ते तयार केले आहेत. आजचे सरकार समाजात जातीय तेढ निर्माण करून वातावरण तणावपूर्ण ठेवत आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मानणारे आहोत, तेच आमचे विचारधन आहे. आमदारकीच्या काळात आम्ही सर्वाधिक विकासकामे केली. जनता हेच माझे ऑक्सिजन आहे. सर्वसामान्यांच्या आशीर्वादामुळे मला आमदारकी आणि खासदारकी मिळाली. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करत आहे. आरोग्य शिबिरे, युवकांसाठी उद्योजकता शिबिरे तसेच महिलांसाठी घरबसल्या उद्योग निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

काही महाराज मंडळी चुकीच्या पद्धतीने बोलतात. खरा पांडुरंगाचा वारकरी असे बोलू शकत नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जयंतीनिमित्त सप्ताह आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.शिवव्याख्याते यशवंत गोसावी म्हणाले की, महापुरुषांचे विचार मुलांमध्ये रुजविले तरच संस्कार टिकतील. संभाजी महाराजांच्या इतिहासातून आदर्श संस्कार शिका, मुलांच्या मोबाईलमध्ये काय सुरू आहे, हे पालकांना माहिती असले पाहिजे. सर्वांगीण सामाजिक सुधारणा आणि समानतेचा संदेश देण्यासाठी संयुक्त साजरी केली पाहिजे असल्याचेही ते म्हणाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कांतीलाल साळवे होते. यावेळी शिवव्याख्याते यशवंत गोसावी, मारुती रेपाळे, अर्जुन भालेकर, सुदाम पवार, सतीश भालेकर, चंद्रभान ठुबे, किरण ठुबे, राजेंद्र ठुबे, द.मा.ठुबे, सरपंच संध्या ठुबे, विजयानंद साळवे, गणेश तांबे, बाबा गायखे, धनंजय व्यवहारे, बापू चत्तर, बाबासाहेब गुमटकर, सूरज नवले, राहुल व्यवहारे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. किरण लोंढे यांनी केले.

हे सुद्धा वाचा :  खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना सहकार्य... एपीआय गितेंना सहआरोपी करा

मारुती रेपाळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
कान्हूर पठार जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार गट) उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता होती. या कार्यक्रमात खा. लंके यांनी जेष्ठ नेते मारुती रेपाळे यांनाच उमेदवारी निश्चित आहे,कामाला लागा तुमचा, विजय निश्चित आहे, अशी घोषणा केली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ