- जाहिरात -spot_img
breaking news

उसनवारीवर सुरू असलेल्या राळेगणसिद्धी केंद्राला आता नियमित मनुष्यबळ

आरोग्य केंद्राचा आकृतिबंध मंजूर
15 नियमित कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती

पारनेर | नगर सह्याद्री
आदर्श गाव राळेगणसिद्धी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अखेर 15 कर्मचाऱ्यांचा नियमित आकृतीबंध मंजूर झाला असून, लवकरच वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी नियुक्त होणार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून उसनवारीवर सुरू असलेल्या आरोग्य केंद्राला आता नियमित मनुष्यबळ मिळणार असल्याने आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राळेगणसिद्धी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत सुमारे दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाली होती. आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री, फर्निचर व इतर सुविधा उपलब्ध असूनही कर्मचारी आकृतीबंध मंजूर नसल्याने केंद्र सुरू होऊ शकले नव्हते. या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधण्यात आले होते.गतवष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारनेर दौऱ्यावेळी हा विषय समोर आल्यानंतर त्यांनी तालुक्यातील इतर आरोग्य केंद्रांमधून कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा वर्ग करून केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या उसनवारीवर हे केंद्र सुरू ठेवण्यात आले.आता शासनाने 15 कर्मचाऱ्यांचा नियमित आकृतीबंध मंजूर केल्याने लवकरच कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व इतर आवश्यक पदांवर नियुक्त्‌‍या होणार आहेत. आकृती बांधनुसार आता दोन वैद्यकीय अधिकारी, तीन आरोग्य सहायक, परिचारिका, परिचर, क्लर्क, शिपाई व वाहनचालक, अशा सुमारे 15 कर्मचाऱ्यांची नियमानुसार नेमणूक होणार आहे. त्यामुळे राळेगणसिद्धीसह परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि नियमित आरोग्य सेवा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सुमारे सात कोटी रुपये खर्च करून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच फर्निचरसह अत्याधुनिक असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे राळेगणसिद्धीसह पानोली, पिंपळनेर, वहुले, राळेगण थेरपाळ, वाडेगव्हाण,नारायणगव्हाण, जातेगाव व घाणेगाव या गावांतील रुग्णांची होणार सोय होणार आहे.
– प्रकाश कांबळे, तालुका आरोग्याधिकारी, पारनेर

हे सुद्धा वाचा :  पोलीस दलात कारभारी बदलले, एलसीबी, कोतवाली तोफखान्यासह अनेकांची बदली
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ