पत्नीचे परदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद | लुकाऊट नोटीस
शिर्डी | नगर सह्याद्री
भोंदूबाबा प्रकरणातील अटक आरोपींच्या तपासादरम्यान पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून समता व जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थांकडून खात्यांची माहिती मागवली होती. या दोन्ही बँकेत जवळपास ६० कोटींची उलाढाल झाली असल्याचे निदर्शनास आले असून अशोक खरात याची बायको कल्पना खरात परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेमार्फत देशातील सर्व विमानतळावर लुकाऊट नोटीस बजावली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शिर्डीत पत्रकारांना दिली.
पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले, अशोक खरात प्रकरणाचा तपास करत असतांना पोलिसांच्या लक्षात आले की या व्यवहारांमध्ये समता व जगदंबा पतसंस्थेची नावे येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी संस्थांना पत्र देऊन खात्यांची माहिती मागवली त्यात राहाता येथील समता पतसंस्थेत ५७ खातेधारकांची सुमारे १०० खाती उघडण्यात आल्याचे आढळले. या खात्यांना नॉमिनी म्हणून अशोककुमार एकनाथ खरात (राहणार नाशिक) यांचे नाव असल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून सुमारे ६० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती असून सध्या सुमारे ७८ लाख ९९ हजार रुपये शिल्लक असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या खात्यांमध्ये खरात कुटुंबीयांची काही खाती तसेच प्रकरणातील इतर आरोपींशी संबंधित खातीही असल्याचे सांगण्यात येत आहे. बहुतांश खात्यांसाठी एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर झाल्याचेही लक्षात आले आहे.तसेच सिन्नर येथील जगदंबा नागरी पतसंस्था सिन्नर एकुण ३२ खातेदारांची खाती उघडण्यात आली असून त्यावर पावणेतीन कोटी रुपयांचा व्यवहार झालेला आहे. सदर तपासात वरील प्रमाणे माहीती उघड झाली आहे. पोलीस अधिक तपास करत असून खातेदारांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे पोलीस आणखीही खाती शोधणार आहे तसेच अन्य बँकांमध्येही चौकशी करण्यात येणार आहे अशोक खरात याची बायको कल्पना प्रदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी देशातील सर्व विमानतळावर लुकाऊट नोटीस जारी केली असल्याची पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यावेळी सांगितले.
लिंगपिसाट खरातकडे येणाऱ्या महिला श्रीमंत, हायफाय घरच्या, पेजथ्रीवाल्या
भोंदूबाबा अशोककुमार खरात प्रकरणात रोज नवनवीन माहिती हाती येत आहे. त्यावरून त्याच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे. सामाजिक क्षेत्रातील अनेक महिलांनी या प्रकरणावर भाष्य करत या प्रकाराचा कडाडून निषेध नोंदवला आहे. सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनीही या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी या प्रकरणावर धक्कादायक माहिती दिली आहे. भोंदूबाबा खरातकडे जाणाऱ्या महिल्या या अडाणी आणि अशिक्षित वाटत नाही. त्या वेगळ्या कॅटेगिरीच्या वाटतात. या महिला हायफाय घरातील वाटतात. श्रीमंत आहेत आणि पेजथ्रीवाल्या आहेत, असा दावा संगीता तिवारी यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.
भोंदूबाबा अशोक खरातकडे गेलेल्या महिला या व्यवस्थेच्या बळी गेल्या आहेत. म्हणजे घरी त्या महिलांना समजून घेतलं जात नाही. आपलं दुःख कुणाकडे सांगायचं? अशा वेळी एखादा मांत्रिक आधार देतो आणि त्या संमोहित होतात. अंधश्रद्धा हीच नशा आहे. त्यामुळे त्यांना गुंगीच औषध दिलं काय आणि नाय दिल काय? तो विषय नंतरचा. त्यात त्यांची एखादी गोष्ट फलित होते. तेव्हा त्यांना भोंदू बाबा देव वाटतो, असं संगीता तिवारी म्हणाल्या.
अशा माणसाकडे कोण जाईल स्वतः शारीरिक सबंध ठेवायला? मला नाही वाटत. मला त्या वेगळ्या कॅटेगरी मधल्या येतात, असं वाटतं. तशा त्या हायफाय घरच्या वाटत आहेत. घरी नवरे मारत असतील, समजून घेत नसतील, मूल होत नसतील जे अडचण असतील त्या हा बाबा करून देतो. आणि तो स्वतः सांगायचं मी श्रीकृष्ण आहे. एवढ्या व्हिडीओमध्ये मला कोणीही अडाणी, अशिक्षित, गरीब महिला वाटली नाही. सगळ्या श्रीमंत, पेज थ्रीमधल्या वाटत आहे. तो सॉफ्ट कॉर्नर कॅच करतो. महिलना कस आकर्षित करायचं त्याच्याकडे आयडिया होती, असंही त्यांनी सांगितलं.
चाकणकरांना पुरावे नष्ट करण्याची संधी दिली जात आहे ?
खरातकडे गेलेल्या महिलांवर कारवाई करा अशी मागणी लेखिका अरूणा सबाने यांनी केली होती,त्यावरही तिवारी स्पष्ट बोलल्या. अरूणा सबाने जर म्हणत असतील महिलांवर कारवाई करा, मग रुपाली चाकणकर तर थेट खरात याच्या पायांचे पूजन करत असताना दिसत आहे,मग सबाने ह्यावर का बोलत नाही त्यावर पण बोललं पाहिजे, अशी मागणी तिवारी यांनी केली. तसेच रुपाली चाकणकर यांना अजून एसआयटीने नोटीस दिली नाही, त्यांना चौकशीआधी पुरावे नष्ट करायचा वेळ दिला आहे का? किंवा बाई तू निघून जा लंडन ला, अशी संधि देत आहेत का रोखठोक सवाल त्यांनी विचारला.. जर ह्यात जर मोठे मंत्री असतील तर ह्या बाई व गायब होतील , असंही त्या म्हणाल्या.
एक दोन व्हिडीओमध्ये दिसतंय की खरात महिलांना काहीतरी प्यायला देतोय, त्या ते प्यातात त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होत असले ,दम मारो दम सारख काहीच कळत नाही आपल्या सोबत काय होतंय. काही तरी मिसळून तो पुरुषांना देत होता ह्या वयात तुमची शक्ती वाढो, ह्यांना काय कळतंय मूत्र पीत होते , असंही त्या म्हणाल्या. टिव्हीवर आपण बघतो, ह्याला माहीत होतं किती गोळ्या दिल्यावर शुद्ब हरपेल,मेडिकल मधून गोळ्या घेऊन येत होता, काहीही होऊ शकतं, मार्केट मध्ये अशा गोळ्या भेटतात, अनेक जण MD वगैरे घेतला त्या वेगळ्या तंद्रीत असतात, असागी दावा तिवारी यांनी केला.










