- जाहिरात -spot_img
breaking news

रेशन दुकानातील गहू , तांदुळावर चोरट्यांचा डल्ला …. राहुरीतील घटना

काळुबाई स्वयंसहायता महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानात चोरी

राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे भर लोकवस्तीमध्ये असलेल्या काळुबाई स्वयंसहायता महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानात दि. 5 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास दरोडा टाकून गहू व तांदूळच्या गोण्या चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली.

राहुरी खुर्द येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस भर लोकवस्तीमध्ये काळुबाई महिला बचत गटाचे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान आहे. दुकानचे चालक सोमनाथ पागीरे यांच्या मातोश्री नित्य नियमाप्रमाणे सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्याकरिता गेल्या होत्या. त्यावेळी स्वस्त धान्य दुकानाच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडलेला त्यांना दिसून आला. त्यांनी तत्काळ सोमनाथ पागिरे यांना याबाबत माहिती दिली. पागिरे हे स्वतः घटनास्थळी आले असता त्यांना दुकानाचा दरवाजा व कुलूप कोयंडा तोडल्याचे दिसून आले. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता साडेअकरा क्विंटल गहू, एक क्विंटल तांदूळ तसेच एक टेबल असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.

घटनेची माहिती समजतात पुरवठा निरीक्षक सुदर्शन केदार, ग्राम महसूल अधिकारी तुषार काळे तसेच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भाऊसाहेब शिरसाट, अर्जुन दारकुंडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन घटनेची माहिती घेतली. पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच अहिल्यानगर येथून ठसेतज्ज्ञाची टीम घटनास्थळी प्राचारण करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  अकरावी प्रवेशाचा पुढचा टप्पा सुरु ; २६ मे २०२६ रोजी पहिली यादी होणार जाहीर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ