- जाहिरात -spot_img
breaking news

अण्णा हजारेंचा भेसळ मुक्तीसाठी नवा लढा!; काय म्हणाले पहा…

अन्नभेसळविरोधी मोहिमेला अण्णांचा पाठिंबा / आयुक्त तुकाराम मुंडे यांचे कौतुक
पारनेर । नगर सह्याद्री
राज्यात सध्या अन्नभेसळ करणार्‍यांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. या मोहिमेचे नेतृत्व करणारे धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले. समाजहितासाठी धाडसी आणि प्रामाणिकपणे काम करणार्‍या अधिकार्‍यांची देशाला आज सर्वाधिक गरज आहे.

तुकाराम मुंडे यांच्यासारख्या अधिकार्‍यांचा प्रशासनात गुणाकार व्हायला हवा, असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे.
अण्णा हजारे यांनी अन्नभेसळीच्या गंभीर समस्येवर चिंता व्यक्त करत म्हटले की, समाजाच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नावर कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे. अशा मोहिमांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मोठी मदत होते. समाजहितासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे अण्णा हजारे हे नेहीच चुकीच्या धोरणांवर कडक शब्दांत टीका करतात. मात्र, त्याच वेळी चांगलं काम करणार्‍या अधिकार्‍यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासही ते विसरत नाहीत. तुकाराम मुंडे यांनी राज्यभर सुरू केलेल्या या मोहिमेमुळे अन्नसुरक्षेबाबत मोठी जनजागृती होत असून, नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अण्णांचा नवा संकल्प : ’शुद्ध खाद्यतेल निर्मिती’
एकीकडे भेसळविरोधी मोहिमेचे कौतुक करताना, अण्णा हजारे स्वत। वयाच्या 90 व्या वर्षीही समाजहिताच्या एका नव्या आणि आगळ्यावेगळ्या उपक्रमात सक्रिय झाले आहेत. नागरिकांना भेसळुक्त अन्न मिळावे, यासाठी त्यांनी ’ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर लाकडी घाण्यातून तयार होणार्‍या शुद्ध खाद्यतेल निर्मितीचा उपक्रम सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा :  सुपा-पारनेर रस्त्यावर भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ