- जाहिरात -spot_img
breaking news

सारसनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; चोरट्यांनी काय केलं पहा

चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद | अटक करण्याची मागणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

अहिल्यानगर : शहरातील बुरुडगाव रोड परिसरातील सारसनगर भागात घरफोड्यांची मालिका सुरू असून चोरट्यांनी विविध भागात डल्ला मारत नागरिकांची झोप उडवली आहे. समता नगर, अभिनव कॉलनी, फुलसौंदर मळा, ओम कॉलनी, नानाजी नगर तसेच महादेव मंदिर परिसरात चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागांमध्ये मिळून आठ ते दहा घरफोड्या झाल्याची माहिती समोर आली असून चोरटे रात्रीच्या वेळी घरांना लक्ष्य करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाले असूनही अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे निवेदन देत चोरट्यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सातत्याने होत असलेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून पोलिसांनी तातडीने तपास गतीमान करून आरोपींना अटक करावी. तसेच संबंधित परिसरात पोलीस गस्त वाढवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून लवकरात लवकर कारवाई होऊन चोरट्यांना अटक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा :  पारनेर-नगर मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना गती
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ