विभागीय आयुक्तांकडून पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची नियुक्ती
महानगरपालिकेकडून दोन्ही समित्यांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदांची निवडणूक १० मार्च रोजी होणाऱ्या सभेत पार पडणार आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या संदर्भात आदेश काढले आहेत. त्यानुसार सकाळी ११ वाजता स्थायी समिती सभापती व त्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार या निवडीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी यांची विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. १० मार्च २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यात प्रथम स्थायी समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापती निवडीचे कामकाज पार पडेल, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
दोन्ही समित्यांसाठी नामनिर्देशन पत्र (अर्ज) दाखल करण्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे :
१. स्थायी समिती सभापती पद
• अर्ज वितरण : शुक्रवार, ६ मार्च २०२६ ते सोमवार, ९ मार्च २०२६ (शनिवार-रविवार वगळून) सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत
• अर्ज स्वीकारणे : सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:०० ते ५:०० वाजेपर्यंत (नगरसचिव कार्यालय)
• छाननी व निवड : १० मार्च २०२६ रोजी सकाळी ११:१५ वाजता विशेष सभा सुरू झाल्यावर
• अर्ज मागे घेणे : वैध उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर १५ मिनिटांच्या आत
२. महिला व बालकल्याण समिती (सभापती व उपसभापती)
• अर्ज वितरण : शुक्रवार, ६ मार्च २०२६ ते सोमवार, ९ मार्च २०२६ (शनिवार-रविवार वगळून) सकाळी ११:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत
• अर्ज स्वीकारणे : सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:०० ते ५:०० वाजेपर्यंत
• छाननी : १० मार्च २०२६ रोजी स्थायी समिती सभापतीची निवड प्रक्रिया संपल्यानंतर
• अर्ज मागे घेणे: उमेदवारांची नावे वाचून दाखवल्यानंतर १५ मिनिटांच्या कालावधीत










