- जाहिरात -spot_img
breaking news

महाऑनलाईन पोर्टल तीन दिवसांपासून ठप्प; दाखले मिळत नसल्याने संताप

विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांची गैरसोय, दाखले मिळत नसल्याने संताप
पाथर्डी | नगर सह्याद्री

राज्य शासनाच्या विविध सेवा उपलब्ध करून देणारे महाऑनलाईन पोर्टल मागील तीन दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पोर्टल बंद पडल्यामुळे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले तसेच इतर शासकीय प्रमाणपत्रे मिळणे मुश्किल झाले आहे.

सध्याच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेचा काळ सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची तातडीची गरज आहे. मात्र पोर्टल बंद असल्याने दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना सेतू केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक पालक व विद्यार्थी तहसील कार्यालय तसेच सेवा केंद्रांवर येऊनही रिकाम्या हाताने परत जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

याशिवाय विविध शासकीय योजनांसाठी अर्ज, नोकरीसाठी कागदपत्रे, बँकिंग व इतर प्रशासकीय कामांसाठी लागणारी प्रमाणपत्रेही अडकून पडली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत तहसीलदार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, तांत्रिक अडचणीमुळे पोर्टलची सेवा विस्कळीत झाली असून ती दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. लवकरच पोर्टल पुन्हा कार्यान्वित होईल, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, महत्त्वाच्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने पोर्टल सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

विद्यार्थी, पालकांचे हेलपाटे
विविध शासकीय दाखले व प्रमाणपत्रांसाठी नागरिक व विद्यार्थी सेतू केंद्रावर गर्दी करत आहेत. परंतु पोर्टल बंद असल्याकारणाने विद्यार्थी व नागरिकांना विविध प्रमाणपत्रे मिळवून देणे मुश्किल झाले आहे.
– रविंद्र शिंपणकर, सेतू केंद्र चालक, मिरी

सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू राहणार
महाऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण राज्यभरात बंद आहे, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांशी संपर्क केला असून तांत्रिक बिघाड झाल्याने पोर्टल बंद असून लवकरच पुन्हा सुरू होईल, असे वरिष्ठांकडून कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोर्टल सुरू झाल्यानंतर सुट्टीच्या दिवशीही कामकाज करून प्रमाणपत्रे लवकरात लवकर वितरित करण्याचा प्रयत्न करू.
– उद्धव नाईक, तहसीलदार, पाथर्डी

हे सुद्धा वाचा :  विजय अक्षयचा अन् चर्चा सुजय विखेंची; लाखाचे मताधिक्य विरोधकांसाठी धोक्याची घंटा 

आयटी विभागाशी संपर्कात
जिल्हाभरातील महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून पोर्टल बंद असल्याबाबत विचारणा होत असून याबाबत आयटी विभागाशी संपर्कात असून त्यांच्याकडून वेळोवेळी दिल्या जाणार्‍या सूचना व माहिती महा-ई-सेवा केंद्र चालकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
– संतोष खैरनार, जिल्हा व्यवस्थापक, महाऑनलाईन

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ