- जाहिरात -spot_img
breaking news

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने घेतला मोठा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री –
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.आता जून-जुलैमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर १७ भरावा लागणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांना खाजगीरित्या परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खाजगीरित्या परीक्षा द्यायची आहे त्यांनी फॉर्म भरायचे आहे. बोर्डाने याबाबत अपडेट दिली आहे.

दहावी-बारावीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या सध्याच्या पत्त्यातील जिल्हा, निवडलेले माध्यम, शाखेनुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल त्यातून एका शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करावी लागेल.

नोंदणी शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे. त्याबाबतची पावती विद्यार्थ्याच्या त्याच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी mahahsscboard.in या संकेस्थळाचा वापर करावा लागणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही नोंदणीप्रक्रिया केली जाणार आहे.याबाबत राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. शाळाबाह्य विद्यार्थी जे नोंदणी करु शकले नाही, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ही संधी देण्यात आली होती. जून-जुलै २०२५ च्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी करु शकतात. या विद्यार्थ्यांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये राज्य मंडळाच्या अटी-शर्तींनुसार नावनोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा :  महिलांसाठी मोठ्या घोषणा; '1 वर्षांपर्यंत प्रसुती रजा' ते 'लवकर या लवकर जा' योजना...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ