- जाहिरात -spot_img
breaking news

ट्रकसह पूल कोसळला;

4 ते 5 गावांचा संपर्क तुटला,

रायगड/नगर सह्याद्री
रायगड जिल्ह्यातील आमणोली गावाकडे जाणारा प्रवासी पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक, ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रॅकमुळेच पूल कोसळल्याचे सांगण्यात येत असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, खडी वाहणारा हायवा ट्रक फसल्याचे दिसून आले

क्षमतेपेक्षा जास्त मालाची पुलावरून वाहतूक होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे, या घटनेमुळे आमणोलीपासून चार ते पाच गावांचा संपर्क तुटलारायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील अमनोली गावाजवळ असणारा एक प्रवासी पूल कोसळल्याची घटना समोर आली. कमकुवत असणाऱ्या या पुलावरून अवजड वाहतूक सुरू होती.

आमणोली येथे अशाच एका अवजड वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकची या पुलावरून वाहतूक सुरू असतानाचा हा पुल कोसळल्याची घटना घडली.वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त लोड हायवा ट्रकमधून वाहून नेण्यात येत असल्यानेच हा पूल कोसळला आणि अपघात घडला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

जांभूळपाड्यापासून पुढे आमणोली, दहिगाव, कोलतरे तसेच आदिवासी वाड्यांकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात पुलाचा प्रश्न मार्गी न लागल्यास विद्यार्थ्यांसह नागरिकांची तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे सुद्धा वाचा :  युवाशक्तीच्या बळावर भाजप अधिक सक्षम करू ; महाडिक
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ