- जाहिरात -spot_img
breaking news

शेतकरी कर्जमाफीचे नियम बदलणार? मोठी अपडेट समोर, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत शेतकरी कर्जमाफीवर सविस्तर चर्चा झाली. आमदार बच्चू कडू यांनी या कर्जमाफी योजनेवर अनेक आक्षेप नोंदवले. तसेच सरकारने योग्य ते बदल करून घ्यावेत, अशी मागणी केली. राज्यातील 2017 सालच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, महात्मा ज्योतिबा फुला कर्जमाफी योजना तसेच या योजनांत प्रोत्साहनपर दिली जाणारी रक्कम काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कर्जमाफीत नाव आलेले आहे पण बँकेत मात्र सरकारने पैसेच दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवे कर्ज भेटत नाहीये. कर्जमाफीची वाट पाहावी लागत आहे. उच्च न्यायालयानेही याबाबत सरकारला पैसे द्यापे लागतील, असे सांगितले. शेतकरी पात्र असतील तर पैसे द्यावे लागतील, असे म्हणत बच्चू कडू यांनी कर्जमाफी योजनेवर आक्षेप नोंदावला आहे. .

एखाद्या शेतकऱ्यावर दोन लाख कर्ज असेल तर…
तसेच सरकार म्हणतंय की 2019 सालच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेत लाभ भेटलेल्या शेतकऱ्याला तुम्ही फक्त 50 हजार रुपये दिले जातील. एखाद्या शेतकऱ्यावर दोन लाख कर्ज असेल तर तुम्ही 50 हजार द्यायचे आणि शेतकऱ्याने दीड लाख भरावे असं होत असेल तर ही एका प्रकारची बँकेची वसुलीच म्हणावी लागेल. या बाबत निर्णय घ्यावा लागेल.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे
शेतकरी कर्जमाफी करताना गुंतागुंती वाढवली. त्यामुळे तोंड द्यावे लागत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे सरकार बदनाम होत असेल तर त्यावर निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही यावेळी बच्चू कडू म्हणाले. तर या प्रश्नाचे उत्तर देताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी धोरण तयार करताना त्या मध्ये या विचारांचा सहभाग करून घेऊ. शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि विकास सर्वांचा केंद्रबिंदू होता. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकरी केंद्रबिंदू आहे. शेतकरी अडचणीत आला आहे त्याला पाठबळ दिलं पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली.

56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी
तसेच, 30 जून पूर्वी कर्ज माही दिली जाईल मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती. आचारसंहिता सुरू असल्यामुळे याबाबत खुलासा करता आला नाही. राज्यात 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केलं आहे. सूचनांचा विचार करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ होईल यासाठी सुधारणा करू, असेही दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावले ...कोणाला दिली समज
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ