- जाहिरात -spot_img
breaking news

शॉर्ट सर्किटमुळे आग, एक एकर गहू जळाला…; नगरमधील घटना

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
प्रमाणापेक्षा जास्त लूज असणाऱ्या वीजवाहक तारा एकमेकांना चिटल्याने लागलेल्या आगीत खडकी तालुका अहिल्यानगर येथील सौ. रोहिणी प्रकाश निकम यांच्या शेतातील एक एकर पेक्षा जास्त गहूं जळून गेला. त्यामध्ये त्यांचे एक लाखांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे.

ही घटना आज दुपारी घडली. खडकी गावठाण शेजारी रोहिणी प्रकाश निकम यांचे गट नंबर 15 चे क्षेत्र आहे. यामध्ये गहू असून तो काढणीला आला आहे. या शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारा खाली आलेल्या आहेत. या तारा व्यवस्थित कराव्यात अशी मागणी त्यांनी वारंवार महावितरण कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे केलेली होती. पण कोणीही त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. आज दुपारी अडीचच्या दरम्यान या वीजवाहक तारा एकमेकांना चिटल्याने आगीचे लोळ गव्हाच्या पिकात पडले.

काढणीला आलेला गहू पूर्णपणे वळलेला असल्याने गव्हाने पेट घेतला आणि आग वाढत गेली. गव्हाचे शेत गावाच्या जवळ असल्याने .गावातील चंद्रकांत कोठुळे (मेजर), अमित सुडगे, राहुल कोठुळे, तनवीर शेख, सुधाकर उमाप, केतन निकम, सुनिल कोठुळे, केतन रोकडे, निखिल निकम, यांनी धावत गव्हाच्या शेतात शिरले आणि त्यांनी आग विझवली. पण तोपर्यंत एक एकर पेक्षा जास्त गव्हाचे पीक जळून गेले होते. यामुळे रोहिणी प्रकाश निकम यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा :  बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; विखेंनी सांगितला राहुरीचा उमेदवार कोण..
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ