- जाहिरात -spot_img
breaking news

विखे-पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सभापती शिंदेची एन्ट्री…

राहुरीतील तनपुरे वाड्यावर घेणार सदिच्छा भेट
अप्पासाहेब मकासरे | नगर सह्याद्री
राहुरी ः जिल्हा मध्यवत सहकारी बँकेच्या निवडणुकीत यावेळी मोठा राजकीय ट्विस्ट पाहण्यास मिळणार आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे हे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत कमालीचे सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सभापती शिंदे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

ज्येष्ठ नेते, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या राहुरीतील राजकीयदृष्ट्‌‍या निर्णय घेण्याचे ठिकाण असलेल्या तनपुरे वाड्यावर सभापती राम शिंदे रविवारी भेट देणार आहे. या भेटीत कोणते राजकीय समीकरणे जमवणार आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सहकारातील राजकारणात आ.प्राजक्त तनपुरे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या शब्दाला राहुरीच्या राजकारणात मोठे वजन आहे. सभापती शिंदे यांनी जिल्हा मध्यवत सहकारी बँकेच्या निवडणुकीत पक्षीय जोडे बाजूला ठेवून सहकाराच्या राजकारणात समविचारी मंडळींचा भेटी घेत आहेत. सहकारात ‌‘सब कुछ विखे‌’ हे समीकरण असताना राम शिंदे यांची सहकारातील या एन्ट्रीने राजकीय वातावरण तापवले आहे.नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेचा निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून बिनविरोध आमदारकीची माळ त्यांचा गळ्यात घातली आहे. रविवारी सभापती शिंदे हे तनपुरे यांच्या वाड्यावर भेट देऊन तनपुरे यांना कोणते साकडेघालणार आहेत. बँकेच्या निवडणुकीनिमित्त कोणती राजकीय समीकरणे जुळवणार आहेत? याची राजकीय चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा :  अहिल्यानगरमध्ये दोन दिवस वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’; कुठे पडणार पाऊस पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ