- जाहिरात -spot_img
breaking news

पेट्रोल पंपांवर गर्दी; शासनाने पंप चालकांना दिला ‘हा’ आदेश, २०० रुपयांचेच…

दुचाकीसाठी संभाजीनगर, परभणीत 200, तर नांदेडमध्ये फक्त 300 रुपयांचं पेट्रोल मिळणार; शासनाचे पंप चालकांना आदेश
छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री :
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन टंचाईचे संकट उभं राहिलंय. या युद्धाचा थेट फटका आता जागतिक अर्थव्यवस्थेला बसत असून युद्धामुळे जगभरात आणि विशेषतः भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा काही अंशी धीम्या गतीने होत आहे. मात्र समाज माध्यमांवरील अफवांमुळे नागरिकांनी पेट्रोलपंपावर एकच गर्दी केल्याचे चित्र आहे. अशातच आता, छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल पंपांवर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याने काही ठिकाणी तात्पुरती टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर , छत्रपती संभाजीनगर प्रशासनाने दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त 200 रुपयांचे आणि चारचाकी वाहनांना हजार रुपयांपर्यंतच इंधन देण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसारच इंधन भरावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नांदेडमध्ये इंधन खरेदीवर नियम जिल्हाधिकाऱ्याने दिले आदेश
युद्धामुळे इंधन विक्री बंद होणार अश्या अफवा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या अफवेमुळे नांदेडच्या पेट्रोल पंपावर वाहन धारक मोठी गर्दी करीत आहेत. अनेकजण अनावश्यक पेट्रोल खरेदी करताना पहायला मिळत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पेट्रोल खरेदीवर नियम लागू केले आहे. दुचाकी धारकांना 300 तर चार चाकी वाहन धारकांना दिड हजार रुपये इंधन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पेट्रोल पंप चालकांना दिले आहे.

परभणीत दुचाकीला मिळणार 200, तर चारचाकीला 2000 चे इंधन
दुसरीकडे, परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये इंधनासाठी नागरिक पेट्रोल पंपांवर गर्दी करत असल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी इंधन विक्रीवर मर्यादा लावली आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात आता दोनशे रुपयांचे इंधन हे दुचाकीला तर दोन हजार रुपयांचे इंधन हे चार चाकीला दिले जाणार आहे. याशिवाय अतिरिक्त कुणालाही इंधन दिले जाणार नाही, त्याचबरोबर बॉटल, कॅन, टाकी यामध्ये इंधन देण्यावरही प्रशासनाने बंधन लावले आहे. कुणीही इंधन नसल्याचा अफवा पसरू नये, जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी मुसळे यांनी कळवला आहे.

हे सुद्धा वाचा :  शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ