- जाहिरात -spot_img
breaking news

कृषिसेवा केंद्र, हार्डवेअर दुकानाला भीषण आग, दोन कोटींचे खते, साहित्य जळून खाक…

राहुरी | नगर सह्याद्री
नगर मनमाड राज्य महामार्गावरील धामोरी फाटा येथील हरीओम कृषीसेवा केंद्र व हार्डवेअर या दुकानाला शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. आगीत तब्बल दीड ते दोन कोटी रूपयांचे रासायनिक खते, सिमेंट, केमिकल व इतर साहित्य जळून खाक झाली आहेत.

सोमवार 20 जुलैला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुकानातुन काहीकाळ धूर सुरू होता. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानचे मालक साईनाथ भिसे हे राहुरी खुर्द येथे रहावयास आहेत. दुकानला आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंगळवार 21 जुलैला मध्यरात्री अडीच वाजता राहुरी नगर परिषद तसेच अहिल्यानगर एमआयडीसी.

अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे विलास गडाख, करण साळवे यांनी अग्निशमन बंबाद्वारे पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने सकाळी सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. या घटनेत रासायनिक खते, सिमेंट, बांधकाम साहित्य जळून खाक झाले.

हे सुद्धा वाचा :  पारेनरमध्ये युरिया खताचा तुटवडा, अन्यथा आंदोलन करू ; राजदेव यांचा इशारा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ