- जाहिरात -spot_img
breaking news

कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, KKR ला लोळवलं

स्पोर्ट्स डेस्क- 
CSK Vs KKR चेन्नई : आयपीएलच्या 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत केलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या होत्या. विजयासाठी 193 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरला विजय मिळवता आला नाही.केकेआरनं 20 ओव्हरमध्ये 7 बाद 160 केल्या. चेन्नईनं केकेअआरला पराभूत करत दुसरा विजय मिळवला. चेन्नईनं कोलकाता नाइट रायडर्सवर 32 धावांनी विजय मिळवला.

कोलकाता नाइट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणे यानं चेपॉकवर टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचा संघ पहिल्यांदा फलंदाजीला चेन्नईचा कॅप्टन 6 बॉलमध्ये 7 धावा करुन बाद झाला.यानंतर संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे यांनी चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आयुष म्हात्रेनं 38 धावा केल्या. यानंतर संजू सॅमसन 38 धावा करुन बाद झाला. सरफराज खान आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी चेन्नईचा डाव सावरला, मात्र, त्यांचा संघ 200 धावांचा टप्पा पार करु शकला नाही. चेन्नईनं 20 ओव्हरमध्ये 5 बाद 192 धावा केल्या. केकेआरकडून कार्तिक त्यागीनं 35 धावा देत 2 विकेट घेतल्या. सुनील नरेन यानं एक विकेट घेतली. वैभव अरोरा केकेआरचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. कॅमेरुन ग्रीन यानं 2 ओव्हर गोलंदाजी केली त्यानं 30 धावा दिल्या.

केकेआरच्या पराभवाची मालिका कायम
कोलकाता नाईट रायडर्सनं आज फलंदाजी क्रमात बदल केले. मात्र, बदल करुन देखील त्यांना यश आलं नाही. फिन एलन आणि सुनील नारायण यांनी केकेआरच्या डावाची सुरुवात केली. फिन एलन 1 रन करुन बाद झाला. सुनील नरेन यानं 24 धावा केल्या. सुनील नरेन यानं 24, अजिंक्य रहाणे 28, अंगकृष रघुवंशी यानं 27 धावा केल्या. मात्र, या तिघांना चागंली सुरुवात मिळून देखील मोठी धावसंख्या उभारता आली नाही. यामुळं त्यांचा पराभव झाला. तर, रिंकू सिंग 6 धावा करु शकला तर कॅमेरुन ग्रीनला भोपळा देखील फोडता आला नाही. रोवमॅन पॉवेल आणि रमणदीप यांनी अनुक्रमे 31 आणि 35 धावा करु शकले. मात्र, ते केकेआरला विजयापर्यंत पोहोचवू शकले नाहीत. कोलकाता चौथ्या पराभवामुळं गुणतालिकेत तळाला पोहोचले आहेत.

हे सुद्धा वाचा :  शेजारील देशातील पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ