निघोज | नगर सह्याद्री
शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी तसेच कांद्याला ४० रुपये किलोचा भाव देण्यासाठी ‘आपली माती आपली माणसं’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मुंबईत मंत्रालयावर पाचशे शेतकर्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये शिरुर व पारनेर तालुयातील शेतकर्यांचा समावेश असणार असल्याची माहिती रुपेश ढवण यांनी दिली.
सरकारने शेतकर्यांना कर्जमाफी दिली नाही. आश्वासन देऊनही हे सरकार असे करीत असेल तर याचा जाब कुणीतरी विचारला पाहिजे.आज शेतकर्यांच्या मालाला भाव नाही. कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. कांद्याला हेटरी दीड लाख रुपये खर्च येतो. उत्पादन व खर्च यांची सांगड घालून आजच्या भावाप्रमाणे कांदा हेटरी मोठ्या प्रमाणात तोट्यात असून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. याची दखल कोणताच पक्ष घेत नाही. म्हणून कोणत्याही पक्षाचा आधार न घेता आम्ही सर्व शेतकर्यांना एकत्र करून मंत्रालयावर मोर्चा काढून हे आंदोलन करणार आहोत. यासाठी इतर जिल्ह्यातील शेतकर्यांनी पाठिंबा दिला असून, हा मोर्चा हजारोंच्या संख्येने राज्यातून असणार आहे.
या आंदोलनात सहभागी होणार्या शेतकर्यांनी पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उनवने, पसायदान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र महाराज सुपेकर, उत्तम लामखडे, पवन महाराज तनपुरे, प्रकाश वाघ, देवराम बुवा लामखडे, गणेश कवाद, ग्रामपंचायत सदस्य योगेश वाव्हळ, संदीप ढवळे, बाबाजी पठारे, राजेंद्र वाळुंज, दादा पाटील वराळ, बाळासाहेब लंके, गोपीनाथ रसाळ, अक्षय भाकरे, आशितोष भुकन, अजय दावभट, संतोष थोरात, संतोष लामखडे, शंकर डोकडे आदींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.










