भेंडा | नगर सह्याद्री
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या 21 जागांकरिता होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता एकूण 240 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर यांनी दिली.
ज्ञानेश्वर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या 21 जागांकरिता निवडणूक होत आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दि.2 जून रोजी अनेकांनी अर्ज दाखल केले. उमेदवार अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख व्यक्तिमध्ये कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, विद्यमान संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, विद्यमान उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विद्यमान संचालक व आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, संचालक ॲड.देसाई देशमुख, रत्नमाला विठ्ठलराव लंघे आदी प्रमुख नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवार दि. 3 जून रोजी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.
गटनिहाय निवडून द्यावयाची
संचालक संख्या व कंसात दाखल अर्ज
शेवगाव 3(21), शहरटाकळी 3 (14), कुकाणा 3(43), नेवासा 2(23), वडाळा 2(22), ढोरजळगाव 2(7), उत्पादक-बिगरउत्पादक व पणन संस्था 1(6), अनुसूचित जाती-जमाती 1(8) , महिला प्रतिनिधी 2(18), इतर मागासवगय 1(43), विमुक्त जाती -भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीमतदार संघ 1(15).










